राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेल्या कानि...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवर कार्यरत असलेल्या या दूध संकलन केंद्राने अवघ्या चार वर्षांत परिसरात दर्जेदार आणि विश्वासार्ह दूध संकलन केंद्र म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या एकजुटीतून उभ्या राहिलेल्या या संस्थेच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून दूध उत्पादकांना आर्थिक लाभाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दूध उत्पादकांना ठेव व रिबीट धनादेशांचे वाटप करण्यात आले. वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या प्रथम पाच दूध उत्पादकांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये श्री. दत्तात्रय गजरे, श्री. बाबासाहेब उऱ्हे, श्री. कारभारी मुसमाडे, श्री. ज्ञानेश्वर वाघ आणि श्री. दत्तात्रय शिंदे यांचा भेटवस्तू व ठेव-रिबीट धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना प्रतिव्यक्ती ५० किलो साखरेचे वाटप करण्यात आले. तसेच प्रति लिटर १ रुपये ५० पैसे या दराने जवळपास २५ लाख रुपयांचे रिबीट दूध उत्पादकांना वितरित करण्यात आले. याशिवाय दूध उत्पादकांना मिठाईचे वाटप करण्यात आले, तर बचत गटाच्या सदस्यांना बचतीच्या लाभांशाची रक्कम देण्यात आली.
यावेळी बचत गटाचे अध्यक्ष दत्तात्रय वरखडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब आरंगळे, देवळाली प्रवरा सोसायटीचे चेअरमन मंजाबापू वरखडे, रामभाऊ वरखडे, भगवान वरखडे, दिलीप वरखडे, बाळासाहेब शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक जगन्नाथ वरखडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन दत्तात्रय वरखडे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब आरंगळे, मंजाबापू वरखडे, गोरख कदम, वसंत वरखडे, आदिनाथ वाणी, दत्तात्रय देठे, अमोल वरखडे, संभाजी वरघुडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांची एकजूट, पारदर्शक कारभार आणि आर्थिक लाभाचे वितरण यामुळे कानिफनाथ दूध संकलन केंद्राने चार वर्षांत परिसरातील दूध उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत