निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

अहिल्यानगर   राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला उद्या (दि. १५) संध्याका...

अहिल्यानगर 



राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला उद्या (दि. १५) संध्याकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार अक्षय कर्डिले यांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पाणी सोडण्याचा निर्णय मार्गी लागला आहे.या आवर्तनाचे पाणी १७ ते १८ नोव्हेंबरपर्यंत राहुरी तालुक्यात पोहोचणार असून, त्यानंतर पुढील पंधरा दिवस कालव्याद्वारे पाणी सुरू राहणार आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील कानडगाव, निमढेरे, तुळापूर, कामधेनू परिसर, कनगर, गणेगाव, चिंचविहिरे आणि गुहा यांसह पश्चिम भागातील गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या या भागातील शेतकऱ्यांसमोर उभ्या पिकांना पाणी देण्याचे मोठे आव्हान होते. त्याचबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडे कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. कर्डिले यांनी या मागणीसाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.पंधरा दिवसांच्या या आवर्तनामुळे पश्चिम राहुरीतील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना जीवदान मिळण्यास मदत होणार असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत