पिंप्रीवळण-चंडकापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पिंप्रीवळण-चंडकापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जरे

राहुरी (प्रतिनिधी)    राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रिंप्रीवळण-चंडकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंदा...

राहुरी (प्रतिनिधी) 



 राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रिंप्रीवळण-चंडकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मंदाबाई सदाशिव जरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सविता रामचंद्र शेटे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली.

ग्रामविकास अधिकारी गोविंद गांधले यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राधेश्याम जाधव, आशाबाई कानडे, आरती आगलावे, सुवर्णा राजळे, आशाबाई पुंड, साईनाथ हापसे, विनायक गोलवड , मा.उपसरपंच शोभाताई आगलावे उपस्थित होते.

तसेच फकिरचंद आगलावे, भाऊसाहेब राजळे, जालिंदर कानडे, बद्रिनाथ जरे, विष्णु पवार, वृद्धेश्वर आगलावे, सदाशिव जरे,संदीप जरे, गणेश जरे, देविदास जरे, विशाल पुंड, तलाठी कराळे कर्मचारी ऋषिकेश डमाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच मंदाबाई जरे यांचे उपस्थित ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत