राहुरी/वेबटीम:- अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राहुरी शहराध्यक्षपदी जोगेश्वरी आखाडा येथील युवा उद्योजक सचिन विठ्ठलराव भोंगळ यांची नुकतीच निव...
राहुरी/वेबटीम:-
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राहुरी शहराध्यक्षपदी जोगेश्वरी आखाडा येथील युवा उद्योजक सचिन विठ्ठलराव भोंगळ यांची नुकतीच निवड करण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते राहुरी येथे श्री. भोंगळ यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
अखिल भारतीय मराठा महासंघाची संघटना बांधणीसाठी मोहीम सुरू आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात समाजासाठी काम करण्याची तयारी तसेच संघटन कौशल्य असणार्या तरुणांना सघटनेत महत्त्वाची जबाबदारी देऊन संघटना बांधणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जोगेश्वरी आखाडा येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले तरुणांचे संघटन असलेले युवा उद्योजक सचिन विठ्ठलराव भोंगळ यांच्याकडे नव्याने राहुरी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष मा राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. निवडीचे पत्र सचिन भोंगळ यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव डौले, सरचिटणीस रमेश बोरुडे, तालुकाध्यक्ष दिनकरराव पवार, प्रभाकर काळे, बाळासाहेब इरूळे, चंद्रकांत टिके, पंचकृषी उद्योग समूहाचे संचालक सचिन रघुनाथ काळे, बाळासाहेब कुंडलिक डौले, आदिनाथ काशिनाथ भोंगळ, आदिनाथ गुंजाळ, रवींद्र हापसे, सुधाकर भास्कर भोंगळ, विठ्ठल जगन्नाथ भोंगळ, ज्ञानेश्वर भोंगळ आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेली अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक तरुणांना मदतीचा हात दिला. शेती व उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मराठा महासंघाने माझ्यावर विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिली आहे. भविष्यात संघटना बांधणीसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून सभासद नोंदणी, शाखा विस्तार, रोजगारासाठी तरुणांना मार्गदर्शन यासारखे संघटनेला अभिप्रेत असणारे कार्यक्रम हाती घेणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित शहराध्यक्ष सचिन भोंगळ यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत