चिंचविहिरे येथील गोपालकृष्ण गोशाळेत वसुबारस उत्साहात साजरी; गोमातेचे पूजन करून चारा दान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे येथील गोपालकृष्ण गोशाळेत वसुबारस उत्साहात साजरी; गोमातेचे पूजन करून चारा दान

राहुरी (प्रतिनिधी)  वसुबारस आणि एकादशी असा दुर्मिळ योग साधत गुरुवारी राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील गोपालकृष्ण गोशाळेत गोमाता व वासराचे...

राहुरी (प्रतिनिधी) 

वसुबारस आणि एकादशी असा दुर्मिळ योग साधत गुरुवारी राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील गोपालकृष्ण गोशाळेत गोमाता व वासराचे पूजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी गोमातेला हिरवा चारा व गूळ भरवून विधिवत पूजा करण्यात आली.



या कार्यक्रमासाठी जैन समाजाचे ज्येष्ठ नेते तथा समाधान उद्योग समूहाचे अध्यक्ष सुवालालजी लुंकड, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र लोंढे, श्रीरामपूर जैन संघाचे लोकेश लोढा, बाळासाहेब खाबिया, मुळा-प्रवरा कारखान्याचे कल्याण शेठ, कुंकूलोळ, विजय विजन, आर. डी. धोंडे, विकी जैन, प्रेस फोटोग्राफर मुसमाडे , श्वेता विजन भारती चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.



यावेळी गोशाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा गोशाळेचे ट्रस्टी प्रेमचंद कुंकूलोळ व ललित चोरडिया यांच्या हस्ते छोटेखानी सत्कार करण्यात आला.



सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असताना अनेक गोप्रेमी व गोभक्तांनी पुढाकार घेत गोमातेसाठी सुमारे पंधरा दिवस पुरेल एवढा चारा दान केला. या दातृत्वामुळे गोशाळेतील गोमातांना मोठा आधार मिळाला आहे. गोशाळेच्या वतीने सर्व गोप्रेमी, दानशूर व्यक्ती व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत