राहुरी फॅक्टरीतील डॉ. विश्वजीत गावडे यांनी संपादन केली एम.एस.ची मानाची पदवी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील डॉ. विश्वजीत गावडे यांनी संपादन केली एम.एस.ची मानाची पदवी

  राहुरी (वेबटीम)  कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि रुग्णसेवेची तळमळ यांच्या जोरावर तरुण डॉक्टर विश्वजीत गावडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्...

 राहुरी (वेबटीम)



 कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि रुग्णसेवेची तळमळ यांच्या जोरावर तरुण डॉक्टर विश्वजीत गावडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत मानाची एम.एस. (मास्टर ऑफ सर्जरी) नाक, कान व घसा तज्ज्ञ ही पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गावडे कुटुंबासह शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. विश्वजीत गावडे यांनी वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास अत्यंत निष्ठेने आणि मेहनतीने पूर्ण केला. राज्यातील नामांकित बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पुणे येथून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, धुळे येथून एम.एस. (नाक, कान व घसा तज्ज्ञ) ही पदव्युत्तर पदवी संपादन करून त्यांनी आपल्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा रोवला.

डॉ. विश्वजीत गावडे हे सेवानिवृत्त शिक्षक शंकरराव गावडे आणि सेवानिवृत्त शिक्षिका प्रमिला गावडे यांचे सुपुत्र आहेत. आई-वडिलांकडून मिळालेले शैक्षणिक संस्कार, मार्गदर्शन आणि मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दिलेले पाठबळ यामुळेच विश्वजीत यांनी हे यशाचे शिखर गाठले आहे.

वैद्यकीय शिक्षण घेत असताना रुग्णसेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा, रुग्णालयातील अथक परिश्रम आणि २४ तास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याची वृत्ती त्यांच्या यशामागील महत्त्वाची प्रेरणा ठरली. कुटुंबीयांनी तसेच हितचिंतकांनी दिलेल्या सदिच्छांमुळे हा प्रवास अधिक प्रेरणादायी ठरल्याचे सांगण्यात आले.

डॉ. विश्वजीत गावडे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग गोरगरीब व गरजू रुग्णांच्या सेवेसाठी करून ते भविष्यात नावलौकिक मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी अनेकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत