देवळाली प्रवरा(वेबटीम) किराणा खरेदीसाठी ग्राहकांना दर्जेदार वस्तू आणि योग्य दर मिळावेत, या उद्देशाने देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरात...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
किराणा खरेदीसाठी ग्राहकांना दर्जेदार वस्तू आणि योग्य दर मिळावेत, या उद्देशाने देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील पांडू शेटे यांच्या दालनात किराणा मालाची होलसेल व रिटेल विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
धान्य, डाळी, तेल, मसाले, साखर, चहा, बिस्किटे, साबण तसेच दैनंदिन गरजेच्या विविध वस्तू येथे उपलब्ध आहेत.
ग्राहकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन दुकानात विविध प्रकारच्या किराणा वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. ताज्या, शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण वस्तूंना प्राधान्य देत ग्राहकांना खरेदीचा चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही प्रकारच्या विक्रीची सुविधा असल्यामुळे घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक ग्राहकांनाही येथे खरेदी करता येणार आहे. योग्य दर, दर्जेदार माल आणि ग्राहकांचा विश्वास हीच दुकानाची प्रमुख वैशिष्ट्ये आहे.
दैनंदिन किराणा खरेदीसाठी शिवरत्न स्टोअर ग्राहकांसाठी एक सोयीस्कर पर्याय ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत