अरेच्चा ! : लेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अरेच्चा ! : लेडी गागाने ट्विट केला संस्कृत श्लोक

वेब टीम : मुंबई पॉप सिंगर लेडी गागा तिच्या गाण्याला बरोबरच चित्रविचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. आज मात्र लेडी गागाची चर्चा सुरू आहे त...


वेब टीम : मुंबई
पॉप सिंगर लेडी गागा तिच्या गाण्याला बरोबरच चित्रविचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. आज मात्र लेडी गागाची चर्चा सुरू आहे तिने केलेल्या ट्विटची.

लेडी गागाने एका संस्कृत श्लोक ट्विट केला. त्यामुळे जगभरातील तिचे चाहते बुचकळ्यात पडले असले तरी ते कौतुक देखील करत आहेत.

या ट्विटमुळे लेडी गागाची भारतात अचानकपणे चर्चा होऊ लागली. लेडी गागनाने ‘लोकाः समस्ताः सुखिनो भवंतु’ हा संस्कृत श्लोक ट्विट केला आहे.

या जगातील ‘सर्वजण सुखी, आनंदी राहो’ असा या संस्कृत श्लोकाचा अर्थ आहे.

जगभरातील चाहत्यांना या ट्विटचा अर्थ समजला नाही.

बऱ्याच जणांनी गुगलचा आधार घेत याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला.
भारतीय चाहत्यांनी लेडी गागाच्या ट्विटला उत्तर देताना श्लोकाचा अर्थ सांगितला आहे.


लेडी गागा संस्कृतमधील या श्लोकाच्या आधारे आपल्या आगामी अल्बमबद्दल काही सांगू पाहत असल्याची शक्यता काही चाहत्यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत