मुंबई : वेबटीम गायीला पवित्र मानणे व अनेक धर्मकुत्यांत तिचा व तिच्या गोरचासां समावेश करणे, हे हिंदूधर्माचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ...
मुंबई : वेबटीम
गायीला पवित्र मानणे व अनेक धर्मकुत्यांत तिचा व तिच्या गोरचासां समावेश करणे, हे हिंदूधर्माचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. वैदिक काळापासून भारतात गायीची महिमा गाजत आली आहे. एवढेच नाही तर गायीच्या शेणाचा वापर आरोग्यासाठी केला जातो. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाचा बाजार मात्र तेजीत आला आहे. त्यामुळे गायीच्या शेणाची ऑनलाईक विक्री जोरात आहे.
खरतर घरच्या धार्मिक विधींसाठी, परसबागेतील शेतीसाठी, डास पळवून लावण्यासाठी गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या हे रामबाण साधन आहे. त्यामुले उत्पादनाच्या यादीत गायीच्या शेणाचा पहिला क्रमांक लागतो.त्यामुळं आता यात गोवऱ्या खरेदीसाठी तुम्हाला रानात किंवा जंगलात जाण्याची गरज नाही. आता चक्क बाजारात आणि फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर गोवऱ्यांची ऑनलाईन विक्री होत आहे.
मात्र मार्केटमध्ये आता किराणाच्या दुकानांमध्ये गोवऱ्यांची विक्री होत आहे. याची किंमत वाचून तुम्हीही थक्क व्हाल. न्यूजर्सीमध्ये 2.99 डॉलर म्हणजेच 214 रुपयांना गाईच्या गोवऱ्या विकल्या जात आहे. ट्विटरवर समर हलार्नकर या युझरनं याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत