शिवसेना आमदारांची तातडीने बैठक, मोठा निर्णय होणार! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवसेना आमदारांची तातडीने बैठक, मोठा निर्णय होणार!

मुंबई: वेबटीम  राज्यात सु रु असलेल्या सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या प्रमुखा...

मुंबई: वेबटीम 
राज्यात सुरु असलेल्या सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या प्रमुखांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिलेला नाहीये. त्यातत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांसोबत चर्चा करुन निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हणजेच २२ नोव्हेंबर रोजी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात आणि आमदारांना काय सूचना करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत