मुंबई : वेबटीम शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्यावर आघाडीमध्ये सहमती झाली असली तरी सत्तावाटपाचे घोडे अडलेलेच आहे. सत...
मुंबई : वेबटीम
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापण्यावर आघाडीमध्ये सहमती झाली असली तरी सत्तावाटपाचे घोडे अडलेलेच आहे. सत्तावाटपासाठी शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुंबईत शिवसेनेशी चर्चा करणार आहेत. त्यापूर्वी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात उशीरा बैठक झाली. यामध्ये 'महाविकासआघाडी' बाबात निर्णय जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरी मुख्यमंत्रीपदासंदर्भातील गूढ अद्याप कायम आहे. एकीकडे मुख्यमंत्रीपद हे पाच वर्षांसाठी शिवसेनेलाच देण्यात येण्याच्या चर्चा आहे तर दुसरीकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरु असल्याचे समजतेमात्र असे झाल्यास राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीला अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देऊन पाच वर्षांसाठी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री असेल अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. असं झाल्यास राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदी खासदार सुप्रिया सुळे यांना संधी देण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचे समजते. राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळाले तर प्रमुख दावेदारांच्या यादीमध्ये सुप्रिया यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. सुप्रिया या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत. २००६ साली त्या राज्यसभेवर पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्या. २००९ साली त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि त्या जिंकून आल्या. यंदा त्यांनी याच मतदारसंघातून विजयाची हॅट्रीक केली आहे. सध्या राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात सुरु असलेल्या राष्ट्रवादी अनेक बैठकींना त्या उपस्थित असतात. अडीच वर्षासाठी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळाल्यास सुप्रिया यांचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही केल्याची बातमी समोर येत आहे.
शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने अखेर मान्यता दिली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे काँग्रेसच्या बैठकीत सांगण्यात आले. शिवसेनेचे ५६ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार असल्याने साहजिकच या दोन्ही पक्षांना जास्त मंत्रिपदे मिळाली पाहिजेत, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. मात्र, काँग्रेसला हे सत्तावाटप मान्य नाही. मुख्यमंत्रीपद वगळता उर्वरित ४२ मंत्रिपदांचे प्रत्येकी १४ मंत्रिपदे असे वाटप व्हावे, असा आग्रह काँग्रेसने धरला. काँग्रेसचा १४ मंत्रिपदांचा दावा राष्ट्रवादीला मान्य नाही. जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपदे हे सूत्र पाळले गेले पाहिजे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. तर उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असा काँग्रेसचा आग्रह आहे. असं असलं तरी तिन्ही पक्षांचे एकमत अद्याप झालेले नाही. त्याचसंदर्भात मुंबईमध्ये शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडणार आहे. आता या बैठकीनंतर तिन्ही पक्षांमधील सत्तावाटपाचा सुवर्णमध्य निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत