शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मधुमक्षिकापालन फायद्याचे -कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा राहुरी मधुमक्षिका हे निसर्गाने दिलेले वर...
शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मधुमक्षिकापालन फायद्याचे
-कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा
राहुरी
मधुमक्षिका हे निसर्गाने दिलेले वरदान आहे. मधुमक्षिकेपासून फार काही शिकण्यासारखे आहे. यामध्ये शिस्त आणि कष्ट करण्याची संस्कृती हे विशेष होय. मधुमक्षिका पालनामुळे शेतकर्यांना परागीभवना व्यतीरीक्त मध, मेण, जेली, प्रोफोलींक्स इत्यादी पदार्थातून अधिकचे उत्पन्न मिळू शकते. मधुमक्षिकेच्या परागिभवनामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये 20 ते 30 टक्क्यापर्यंत वाढ होते. म्हणजेच शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मधुमक्षिकापालन फायद्याचे आहे असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि किटकशास्त्र विभाग व राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान प्रकल्प नवी दिल्ली, हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व शाश्वततेकरीता मधुमक्षिकापालन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी अध्यक्षिय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यशवंत फुलपगारे, कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चिदानंद पाटील, हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून कर्नाटक येथील मधुमक्षिका तज्ञ श्री. बी.व्ही. अपुर्वा व श्री. पी.आर. बद्रिप्रसाद उपस्थित होते.
कुलगुरु पुढे म्हणाले, आयुर्वेदामध्ये मधाला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. मधातून उत्तम प्रकारचे प्रथिने मिळतात म्हणुन लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत प्रभावी औषध, उत्तम खाद्य म्हणुन मधाचा उपयोग करतात. भुतलावरील 50 टक्क्यांपेक्षा जास्त वनस्पती या परपरागीभवनासाठी मधुमक्षिकेवर अवलंबुन आहेत. मधुमक्षिका संगोपन ही काळाची गरज असून वनस्पतींचे अस्तित्व आणि जैवविविधता टिकवण्यामध्ये मधमाशांचा मोठा वाटा आहे.
संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मधुमक्षिकेद्वारा होणार्या परागिभवनामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंत वाढ होते. मधुमक्षिकेपासून मिळणार्या पदार्थांमुळे देशात मधुमक्षिका पालनाला मोठा वाव आहे. त्यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराची संधी निर्माण होऊ शकते.
या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चिदानंद पाटील यांनी केले. यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दादाभाऊ यादव, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण, रोगशास्त्र व कृषि अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, शास्त्रज्ञ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले आणि आभार डॉ. एम.जी. शिंदे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत