मुंबई :वेबटीम राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवार यांनी आमदरांकरवी शरद पवार या...
मुंबई :वेबटीम
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवार यांनी आमदरांकरवी शरद पवार यांना पाठवला असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समजतं आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आज पाहण्यास मिळाला. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवार यांना निरोप पाठवणं हे अत्यंत सूचक आहे. अजित पवार यांनी बंड करुन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इतका अनपेक्षित होता की अजित पवार यांनी आज थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली.

या बैठकीत धनंजय मुंडे आले तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.तसंच अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. दरम्यान याच बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला हा निरोप शरद पवारांना पाठवला आहे असं समजतं आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
आज सकाळीच आपण महाराष्ट्रातल्या राजकारणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहिला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राजभवनावर शपथ घेतली. कालपर्यंत अजित पवार हे महाविकास आघाडीच्या सगळ्या बैठकांना हजर होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचं सरकार स्थापन करायचं असाही ठराव झाला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावालाही पसंती दर्शवण्याच्या प्रस्तावालाही पसंती दर्शवण्यात आली. असं सगळं असताना आज थेट अजित पवार यांनी भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारा हा त्यांचा निर्णय होता.
अजित पवार यांचा हा निर्णय व्यक्तीगत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच अजित पवार हे असा काही निर्णय घेतील असं वाटलं नव्हतं असंही पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान वाय. बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी पक्ष फुटावा असं वाटत नसेल तर भाजपासोबत चला असा निरोप शरद पवारांना आमदारांकरवी पाठवल्याचं समजतं आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत