'त्या' दोन अटी मान्य न केल्यानेच राष्ट्रवादी-भाजपचं नासलं ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'त्या' दोन अटी मान्य न केल्यानेच राष्ट्रवादी-भाजपचं नासलं !

मुंबई : वेबटीम राज्यात भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसमोर दोन अटी ठेवल्या होत्या, अशी माहि...

मुंबई : वेबटीम
राज्यात भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसमोर दोन अटी ठेवल्या होत्या, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन अटी मान्य केल्या असत्या तर राज्यात भाजप-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झालं असतं. पहिली अट म्हणजे सुप्रिया सुळे यांना केंद्रात कृषी मंत्रिपद द्यावं आणि देवेंद्र फडणवीस यांना हटवलं जावं ही दुसरी अट होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्हीही अटी अमान्य केल्या. ‘आयएएनएस’ला भाजपातील सूत्रांनी ही माहिती दिली.महाराष्ट्रात समर्थन मिळवण्यासाठी सुप्रिया सुळे यांना अत्यंत महत्त्वाचं असलेलं कृषी मंत्रालय दिल्यास, बिहारमधील जेडीयू या मित्रपक्षानेही रेल्वे मंत्रालयावर दावा ठोकला असता. कारण, बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप सत्तेत आहेत. त्यामुळे केंद्रात स्पष्ट बहुमत असतानाही भाजपला अत्यंत दोन महत्त्वाची मंत्रालये गमवावी लागली असती’, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत