राहुरीत तलाठ्यांना लॅपटॅपचे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत तलाठ्यांना लॅपटॅपचे वाटप

राहुरी प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेल्या लॅपटॉप चे दिनांक २७ नोव्हेंबर रोजी राहुरी येथील तहसीलदार फसिओद्दीन शेख यांच्या हस्त...

राहुरी प्रतिनिधी,
महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेल्या लॅपटॉप चे दिनांक २७ नोव्हेंबर रोजी राहुरी येथील तहसीलदार फसिओद्दीन शेख यांच्या हस्ते कामगार तलाठी यांना वाटप करण्यात आले. यामुळे कामगार तलाठी यांचे कामकाज जलद गतीने व होण्यास मदत होईल. असे तहसीलदार शेख यांनी सांगितले.
         गाव पातळीवर असलेले कामगार तलाठी कार्यालयाचे कामगार जलद गतीने व सू सुत्रीतपणे चालावे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक कामगार तलाठी यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात येत आहे. राहुरी तालूक्यात एकूण ३८ कामगार तलाठी कार्यालय आहेत. त्या प्रमाणे शासनाकडून आज २५ लॅपटॉप आले होते. आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी तहसील कार्यालय येथे तहसीलदार फसिओद्दीन शेख, नायब तहसीलदार गणेश तळेकर व चंद्रकांत दुर्गे यांच्या हस्ते कामगार तलाठी यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. यामुळे कामगार तलाठी यांचे कामकाज जलद गतीने होईल. तसेच नागरीकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. यामध्ये ऑनलाईन नोंदी करणे, ऑनलाईन सात बारा उतारे लवकरात लवकर देण्यात येईल. उर्वरित लॅपटॉप लवकरच महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येईल. अशी माहिती तहसीलदार फसिओद्दीन शेख यांनी दिली आहे.
          यावेळी राहुरी येथील कामगार तलाठी अभिजीत शिरसागर, संजय आडोळे, जालिंदर पाखरे, याकूब शेख, साहेबराव थोरात, परशुराम सुर्यवंशी, अंकुश सोनार, अनिल धुमाळ, अशोक थोरात, मनोज शिरसाठ आदि कामगार तलाठी उपस्थित होते. आज पर्यंत तलाठी कार्यालयाचे कामगाज जुन्या पद्धतीने चालू असल्याने काम करताना अनेक अडचणी येत होत्या. कॉम्प्युटर जुने असल्याने त्यातील व्हर्जन जुनेच होते. आता शासनाकडून मिळालेल्या लॅपटॉपमध्ये नवीन व्हर्जन आले आहे. त्यामुळे कामकाज करणे सोपे होईल आणि कमी वेळेत ऑनलाईन नोंदी करण्यासाठी मदत होईल. असे मत राहुरी बुद्रुकचे कामगार तलाठी अभिजीत शिरसागर यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत