राहुरीत महिलांसाठी जादू गिनींची..; बचत गटाचा अभिनव उपक्रम! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत महिलांसाठी जादू गिनींची..; बचत गटाचा अभिनव उपक्रम!

राहुरी : प्रतिनिधी    महिलांच्या सर्वांगिण विकास आणि सक्षमीकरणासाठी त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता गरजेची आहे, असे प्रतिपादन राहु...


राहुरी : प्रतिनिधी
   महिलांच्या सर्वांगिण विकास आणि सक्षमीकरणासाठी त्यांच्यामध्ये आर्थिक साक्षरता गरजेची आहे, असे प्रतिपादन राहुरी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी तापकिरे यांनी सांगितले.
 राहुरी येथील संत शिरोमणी रोहिदास समाज मंदीर येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, राहुरी नगरपरिषद आणि  लर्निंग लिंक फॉन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘आर्थिक साक्षरता’ या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करत होते.
     यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी राऊत, प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक महेश अबूज, लेखापाल अनिल गुंजाळ, दिनदयाल अंत्योदय योजना क्षेत्रिय व्यवस्थापक राणी पगारे, सहयोगिणी योगिता चुंबळकर, कल्याणी पवळे आदी उपस्थित होते.
   यावेळी महिलांना डिजीटल पद्धतीने आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यात आले. त्यात कर्ज, जोखीम संरक्षण आणि विमा, आर्थिक नियोजन, सरकारी योजना,   गुंतवणूक  याबाबत ‘जादू गीन्नीची’ या उपक्रमातून महिलांना ऑनलाईन प्रबोधन करण्यात आले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत