हवामानावर आधारित पिके घ्या: पोपटराव पवार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

हवामानावर आधारित पिके घ्या: पोपटराव पवार

राहुरी : विशेष प्रतिनिधी आजच्या शेतीपुढे दोन समस्या आहेत. एक कमी पाण्याची व दुसरी जास्त पाण्याची. हरितक्रांतीनंतर आपण उत्पादनामध्ये भर...


राहुरी : विशेष प्रतिनिधी
आजच्या शेतीपुढे दोन समस्या आहेत. एक कमी पाण्याची व दुसरी जास्त पाण्याची. हरितक्रांतीनंतर आपण उत्पादनामध्ये भरीव वाढ केली. परंतु जास्त उत्पादनाच्या नादात माती व पाणी खराब करुन टाकले. यासाठी प्रयत्नपुर्वक पाण्याचा ताळेबंध ठेवणे, बाजारपेठ आधारीत पीक पध्दती आणि कृषि हवामान अधारीत पीक पध्दतीचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे प्रतीपादन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि विस्तार व प्रसारण विभाग आणि महाराष्ट्र विस्तार शिक्षण सोसायटी, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय न पोहचलेल्या शेतकर्यांपर्यंत पोहचून शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषि विस्तार या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन पोपटराव पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्र शासनाच्या शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणार्या कमिटीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, महाराष्ट्र विस्तार शिक्षण सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.आर. सिन्हा, महाराष्ट्र विस्तार शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. एल.बी. कलंत्री, संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, परिसंवादाचे आयोजन सचिव व कृषि विस्तार शिक्षण व प्रसारण विभाग प्रमुख डॉ. मिलिंद अहिरे उपस्थित होते.
डॉ. अशोक दलवाई आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, तंत्रज्ञान न पोहचलेल्या शेतकर्यांपर्यत तंत्रज्ञानाची माहिती पोहचविण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणे गरजेचे आहे. वाणाची उत्पादन क्षमता आणि शेतकर्यांनी काढलेले उत्पादन यातील दरी कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणे, यासाठी प्रभावी विस्तार यंत्रणा असणे गरजेचे आहे. कृषि पदवीधरांनी जीथे असाल तेथे त्या गावात बदल घडवून आणावा. यावेळी कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, शेतकर्यांशी संवाद साधा, त्यांचे अनुभव जाणुन घ्या, त्यांच्या अडचणी शोधा, त्यावर मात करण्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा.
यावेळी पाच सत्रांच्या अध्यक्षांनी दोन दिवसात झालेल्या तांत्रिक सत्रांचा सारांश सादर केला.  महाराष्ट्र विस्तार शिक्षण सोसायटीच्या वतीने डॉ. मिलिंद अहिरे यांना उकृष्ठ शास्त्रज्ञ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी सन 2017 व 2018 या वर्षांच्या सर्वोत्कृष्ट शास्त्रीय लेखासाठी अनुक्रमे डॉ. एस.व्ही. करंजे व डॉ. रेखा तिवारी यांना गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट लेख सादरीकरणामध्ये विद्यार्थी गटात पहिले, दुसरे व तीसरे पारितोषीक अनुक्रमे पी.यु. राठोड, डॉ. आनंद, संतोष पठाडे यांना तर उत्कृष्ट संशोधनावर आधारीत लेख सादरीकरणामध्ये शास्त्रज्ञ गटात पहिले, दुसरे व तीसरे पारितोषीक अनुक्रमे डॉ. पंडित खर्डे, डॉ. एस.जी. पुरी व डॉ. पी.एस. कापसे यांना मिळाले. उत्कृष्ठ पोस्टर सादरीकरणासाठी पहिले पारितोषीक आर.जी. नय्यर तर दुसरे पारितोषीक वीणा एस. जाधव यांना मिळाले. उत्कृष्ठ दृकश्राव्य साधनांचा वापर या गटात प्रथम पारितोषीक जी.पी. चव्हाण यांना तर दुसरे पारितोषीक साई श्री यांना मिळाले.
या राष्ट्रीय परिसंवादात देशभरातून 200 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले. प्रास्ताविक  डॉ. ए.बी. कलंत्री यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत