देवळाली प्रवरा : श्रीकांत जाधव येथील चैतन्य उद्योग समुहाला विळद घाट येथील विखे पाटील फाउंडेशन संचलित इंग्लिश मिडीयम स्कुल सीबीएसई पॅटर्...
देवळाली प्रवरा : श्रीकांत जाधव
येथील चैतन्य उद्योग समुहाला विळद घाट येथील विखे पाटील फाउंडेशन संचलित इंग्लिश मिडीयम स्कुल सीबीएसई पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध प्रकल्पांची माहिती घेतली.
विद्यार्थ्यांना दैनंदिन शालेय ज्ञानाबरोबर उद्योग व्यवसायाची माहिती लहान वयातच मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही औद्योगिक सहल आयोजित केली होती. ५ ते ७ वर्गातील जवळपास २०० विद्यार्थ्यांनी दूध संकलन व प्रक्रिया, पॅकेजिंग, उपपदार्थ निर्मिति, बर्फ कारखाना तसेच चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्पची पहाणी करून माहिती घेतली. यावेळी चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेशराव भांड, संदीप भांड यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना गणेश भांड म्हणाले की, शालेय अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना बालवयातच व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी शालेय औद्योगिक सहल मोलाची भूमिका बजावितात. प्राचार्य पराग अग्रवाल यांनी शहरातील रोजच्या वातावरणातुन आज आमचे विद्यार्थी ग्रामीण माळराणावर येऊन आनंदित झाले. गणेश भांड यांनी उभारलेला प्रकल्प कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
प्राचार्या पराग अग्रवाल, प्रदीप पाटील, हेमा गुलाटी, यासमिन शेख, खलिदा खान, नेहा कावडे, असलेसा देठे, सविता म्हस्के, संदीप रहाणे, प्रितिका दहिफळे, रुचिका साताळकर, वर्षा शिंदे, निकिता गायकवाड आदिंचा सन्मान करण्यात आला.
प्रसंगी व्यवस्थापक मगन अंकुशे, परवेज पठाण, रवींद्र पेरणे, सुनील अनाप, भारत भांड, अजीज शेख, शशिकांत गाडे, निलेश कराळे, सोमा सरोदे, मच्छीन्द्र महाडिक, सुभाष कांबळे, सुधा कदम,निलेश ओहळ, गणेश डावखर आदींनी परिश्रम घेतले.आभार व सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले.
*चिमुरडे थिरकले ठेक्यावर*
चैतन्य मिल्कच्यावतीने श्रीखंड व पाणी बॉटल दिल्यानंतर मोकळ्या रानात विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला त्यानंतर मराठ मोठ्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करत चांगला ठेका धरला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत