राहुरी : विशेष प्रतिनिधी तालुक्यातील एका पतसंस्थेत बनावट कर्जदार दाखवून कोट्यावधीचा आर्थिक अपहार झाला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू ...
राहुरी : विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील एका पतसंस्थेत बनावट कर्जदार दाखवून कोट्यावधीचा आर्थिक अपहार झाला असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा निबंधकासह सहकार विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यात एक नामांकीत पतसंस्था आहे. तिचे वार्षिक व्यवहार कोट्यावधी रुपयांचे आहेत. अनेक वर्षापासून या संस्थेत एकाधिकारशाही आहे. त्यामुळे अन्य पदाधिकार्यांचेही फक्त नावापुरतेच अधिकार आहेत. या पतसंस्थेच्या एक-दोन पदाधिकार्यांनी संस्थेच्या व्यवहारात मोठा घोटाळा केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये तर या पदाधिकार्यांनी मोठा कहरच केला आहे. ज्या नावाचे लोक अस्तित्वातच नाही, अशा लोकांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज दाखवले आहे. आता नावही बनावट आणि त्यांच्या स्वाक्षर्याही बनावट असल्याचेही बोलले जात आहे. संबधित संस्थेच्या काही कर्मचार्यांनाही या प्रकरणामुळे चांगलाच धक्का बसला आहे. तालुक्यात अनेक संस्था ‘प्रेरणा’ देणार्या आणि राज्यापुढे ‘आदर्श’ ठेवणार्या असताना अशाप्रकारे पतसंस्थेच्या दैद्ीप्यमान यशावरचा ‘प्रकाश’ हटवून त्यावर ‘काळोख’ पसरविणार्या संस्थेची चौकशी व्हावी, अशी मागणी एका इसमाने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत