आता माघार नाही...; दीपक ढोकणे यांचा राजकीय एल्गार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आता माघार नाही...; दीपक ढोकणे यांचा राजकीय एल्गार

उंबरे ः  उंबरे गावच्या सर्वांगिण विकासासाठी प्रभाग क्रमांक पाचमधून आपण  उमेदवारी करणार असल्याची घोषणा युवा कार्यकर्ते दीपक उर्फ...



उंबरे ः 
उंबरे गावच्या सर्वांगिण विकासासाठी प्रभाग क्रमांक पाचमधून आपण  उमेदवारी करणार असल्याची घोषणा युवा कार्यकर्ते दीपक उर्फ पप्पू राजेंद्र ढोकणे यांनी केली. दरम्यान, आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असेही ढोकणे यांनी ठामपणे सांगितले.
पप्पू ढोकणे म्हणाले, उंबरे गावात माझा जन्म झाला असल्याने या जन्मभूमीसाठी आपलेही योगदान द्यावे, अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत गावासाठी सर्वांनीच चांगले काम केले आहे. त्यामुळे आता त्यांना आणखी त्रास देण्यापेक्षा आपण राजकारणात उतरून समाजकारण करावे, अशी इच्छा आहे. त्यामुळे काही मित्रांनी आणि ग्रामस्थांनी केलेल्या आग्रहामुळे आता निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभाग क्रमांक पाच या हनुमान वार्डातून मी स्वतः निवडणूक लढणार आहे. गावचा विकास हाच माझा अजेंडा असणार आहे. गावातील जनतेला सर्व सोयीसुविधा देण्यासाठी मी वचनबद्ध असणार आहे. तसेच गावातील जनतेला आरोग्य, वीज, पाणी, स्वच्छता बाबत विशेष दक्षता घेणार आहे. याशिवाय अन्य प्रश्‍न आणि त्याच्या सोडवुणीचे सर्व उपाय घेवून मी जनतेसमोर येणार आहे. प्रारंभी सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या छत्रपती प्रतिष्ठाणकडून लढण्याची माझी इच्छा आहे. त्यांनी संधी दिली तर आनंदच आहे. अन्यथा अपक्ष म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. गोरगरीब जनता  माझ्यामागे उभी असल्याने मला विजयाची खात्री असल्याचा विश्‍वासही ढोकणे यांनी व्यक्त केला. 

1 टिप्पणी