उंबरेत तरूणांची आदर्श गाव विकास आघाडी : प्रा. ढोकणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरेत तरूणांची आदर्श गाव विकास आघाडी : प्रा. ढोकणे

उंबरे : लक्ष्मण पटारे उंबरे गावच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. रामकृष्ण ढोकणे फाउंडेशन, छत्रपती प्रतिष्ठाण व अन्य मित्र संघटनांना ...


उंबरे : लक्ष्मण पटारे

उंबरे गावच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. रामकृष्ण ढोकणे फाउंडेशन, छत्रपती प्रतिष्ठाण व अन्य मित्र संघटनांना सोबत घेवून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल तयार करणार असल्याची घोषणा प्रा. रामकृष्ण ढोकणे यांनी केली.
ढोकणे म्हणाले, उंबरे गावामध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. येथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न कायमच भेडसावत असतो. याशिवाय आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वच्छता इत्यादी मुलभूत प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे.   गेल्या अनेक वर्षापासून गावात भरीव विकास कामे होऊ शकलेली नाहीत. त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी त्यातच काही ग्रामस्थ व तरूणांनी माझ्याकडे येवून आपण गावाला पर्याय द्यावा, अशी विनंती केली. त्यावर विचार करून मी आपल्या जन्मभूमिसाठी ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आदर्श गाव विकास आघाडी’ या नावाने आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यासाठी सर्व मित्रपक्षांना सोबत घेवून निष्पक्ष आणि स्वच्छ कारभारासाठी आम्ही जनतेशी वचनबद्ध असणार आहोत व निश्‍चितच जनता आम्हाला एक संधी देईल, असेही ढोकणे यांनी स्पष्ट केले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत