आपल्या पुढील पिढीस काय उत्तर देणार ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आपल्या पुढील पिढीस काय उत्तर देणार ?

नमस्कार मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर आपण एकाच गावात राहणारी भावंडं आहोत, परंतु आप-आपल्या वैक्तिक कामाच्या व्यापामुळे एकमेकांशी फार कम...

नमस्कार मित्रांनो,

खरं पाहायला गेलं तर आपण एकाच गावात राहणारी भावंडं आहोत, परंतु आप-आपल्या वैक्तिक कामाच्या व्यापामुळे एकमेकांशी फार कमी गाठी भेटी होतात म्हणून भावा ऐवजी मित्रांनो असा नामोल्लेख केला..... असो..

मित्रांनो आपल्या उंबरे गावाच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र यावे आणि गावपातळीवर फक्त राजकारण नाही तर समाजकारण व्हावे व गावाची विकास गंगा एका आदर्श गावापर्यंत जाऊन पोहचवावी यासाठी मी एक प्रयत्न नक्कीच करणार आहे.

मित्रांनो आपण नेहमी म्हणतो की गावचे राजकारण फार वाईट आहे त्यात पडायलाच नको, तुमचे म्हणणं बरोबर आहे पण आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी जर हा संकुचित विचार केला तर कदाचित आपली पुढील पिढीस आपण काय उत्तर देणार. 

आजही गावापुढे खूप मूलभूत असुविधा आहेत, जसे पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, शिक्षण, भ्रष्टाचार .....इत्यादी. 

आपली भावी पिढी देखील त्याच समाजामध्ये, परिसरामध्ये वाढत आहे, उद्या ती पिढी देखील कदाचित व्यसनी, असंस्कृत बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे ही आपण एकूण आयुष्यपैकी जितकी वर्ष जगलो त्यापेक्षा कदाचित कमीच वर्ष आपल्याकडे शिल्लक राहिली असतील, आणि तसे असेल तर मग सुरुवात कधी करणार? व कोण करणार? हा एक मोठा प्रश्नच आहे.

मित्रांनो माझा निर्णय झाला आहे- गावाच्या विकासासाठी, गावातील भावी पिढीसाठी चांगल्यात चांगल्या सुविधा व संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी येणाऱ्या काळात राजकारणात उतरून समाज कारण करण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. त्यात यश मिळो किंवा अपयश मिळो त्याचा विचार मी कधीच केला नाही. अपयशी जरी झालो तरी मी माझ्या गावासाठी/भावी पिढीसाठी एक प्रयत्न केला होता असे गर्वाने सांगेल. पण हा पहिलाच प्रयत्न यशस्वी करायचा असेल तर मला आपली साथ हवी आहे, तुमच्या सर्वांशिवाय कदाचित तो प्रयत्न अयशस्वी होईल असे मला वाटते.

मला माहीत नाही आपली सर्वांची राजकीय पार्श्वभूमी कोणत्या पक्षाची आहे. कदाचित त्यामुळे तुम्ही माझ्या विचारांबरोबर येण्यास तयार पण होणार नाहीत. मित्रांनो पण जर वेगळ्या विचार प्रवाह असलेले दोन राष्ट्रीय पक्ष जर एकत्र येऊ शकतात तर गावच्या विकासासाठी व भावी पिढीच्या भविष्यासाठी आपणांस एकत्र येण्यास काहीच हरकत नसावी असे मला वाटते.

मित्रांनो आदर्श व्यक्तींच्या गोष्टी आपल्या मुलांना कुठपर्यंत ऐकवणार. आपल्या मुलांनी आपल्या वडिलांनाच आदर्श व्यक्ती मानावे एवढा संघर्ष तर आपण नक्कीच केला पाहिजे असे मला वाटते.

मित्रांनो माझा निर्णय झाला आहे- गावाच्या विकासासाठी, गावातील भावी पिढीसाठी चांगल्यात चांगल्या सुविधा व संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी येणाऱ्या काळात राजकारणात उतरून समाज कारण करण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. त्यात यश मिळो किंवा अपयश मिळो त्याचा विचार मी कधीच केला नाही. अपयशी जरी झालो तरी मी माझ्या गावासाठी/भावी पिढीसाठी एक प्रयत्न केला होता असे गर्वाने सांगेल. पण हा पहिलाच प्रयत्न यशस्वी करायचा असेल तर मला आपली साथ हवी आहे, तुमच्या सर्वांशिवाय कदाचित तो प्रयत्न अयशस्वी होईल असे मला वाटते.

।।विचार बदला.. जीवन आपोआप बदलेल।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत