जनतेच्या सेवेसाठी वार्ड नंबर पाचमधून लढणार : संजय अडसुरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जनतेच्या सेवेसाठी वार्ड नंबर पाचमधून लढणार : संजय अडसुरे

उंबरे: प्रतिनिधी    उंबरे हे माझे गाव आहे आणि या गावासाठीं योगदान देणे हे माझे कर्तव्य असून गावातील जनतेची सेवा करणे ही माझी नैतिक जबाब...

उंबरे: प्रतिनिधी   
उंबरे हे माझे गाव आहे आणि या गावासाठीं योगदान देणे हे माझे कर्तव्य असून गावातील जनतेची सेवा करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. आज गावाची झालेली अवस्था पाहून मी प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभागाची नवीन रचना झाल्याने माझा विजय निश्चित आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी मला अनेक दरवाजे खुले असल्याची बोलकी प्रतिक्रिया युवानेते संजय अडसुरे यांनी दिली.                                                             मी एक मतदार या संकल्पनेतून बोलताना अडसुरे म्हणाले, वार्ड 5 मध्ये माझ्या जिवाभावाची माणसे आहेत. मोठा मित्र परिवार आहे, असंख्य पाहुणे आहेत, मी सदैव जनतेमध्ये आहे, नेहमी लोकांच्या सुखदुःखात आहे. त्यामुळे जनता मी निवडणूक लढवावी यासाठी आग्रही आहे. माझी आमचे मार्गदर्शक तनपुरे कारखान्याचे जेष्ठ संचालक नामभाऊ ढोकणे यांच्या पार्टीकडून लढण्याची इच्छा आहे. त्यांनी संधी दिली तर या संधीचे सोने करून दाखवेल, अन्यथा मला उमेदवारीसाठी तिसऱ्या आघाडीचा  पर्याय खुला असल्याचेही त्यांनी सांगितले.  दरम्यान, गावाचा विकास हाच माझा ध्यास राहणार आहे, गावातील जनतेला सर्व सोयीसुविधा पुरविण्यासाठी मी कटिबद्ध राहील, उतणार नाही मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही, कधीही जनतेचे उपकार विसरणार नाही, असेही अडसुरे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत