जुने-नवे कार्यकर्त्यांची आघाडी तयार करा: अशोक ढोकणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जुने-नवे कार्यकर्त्यांची आघाडी तयार करा: अशोक ढोकणे

उंबरे: प्रतिनिधी उंबरे गावात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास खुंटला आहे. विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी गावातील काही जेष्ठ ...

उंबरे: प्रतिनिधी

उंबरे गावात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास खुंटला आहे. विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी गावातील काही जेष्ठ आणि तरुणांची सांगड घालून गावाला पर्याय उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोकणे यांनी सांगितले.        राहुरी तालुक्यात उंबरे हे गाव लोकसंख्येने आणि विस्ताराने मोठे आहे. मात्र विकासाबाबत अजूनही येथे समाधानकारक असे काम झाल्याचे पाहायला मिळत नाही. गावात आजही अनेक प्रश्न रखडलेले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी गावातील तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. छत्रपती प्रतिष्ठानने या कामी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. मात्र त्यांनी काही जेष्ठ लोकांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतले तर आणखी फायदा होऊ शकतो.त्यामुळे जुने-नवे कार्यकर्त्यांचा मेळ घालून गावाला पर्यायी मंडळ देऊ व गाव विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात करू यासाठी मी गावातील काही राजकीय लोकांशी चर्चा केली असून यातून नक्कीच एक आदर्श अशी आघाडी तयार होईल, असा विश्वास अशोक ढोकणे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत