उंबरे : प्रतिनिधी 21 व्या शतकाकडे वाटचाल करताना महिला खऱ्या अर्थाने सक्षम बनली आहे. त्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी एक हक...
उंबरे : प्रतिनिधी
21 व्या शतकाकडे वाटचाल करताना महिला खऱ्या अर्थाने सक्षम बनली आहे. त्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून या माध्यमातून आज महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे प्रतिपादन सोनाली गोरक्षनाथ शेजुळ यांनी केले. उंबरे येथे राजमाता बचत गटाची स्थापना करण्यात आली.यावेळी त्या बोलत होत्या. सोनाली शेजुळ म्हणाल्या, पूर्वीच्या चूल आणि मूल या संकल्पनेतून आजची महिला बाहेर पडली आहे. आपला प्रपंच सांभाळतानाच छोट्यामोठ्या गृहउद्योगातून हीच महिला आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहे. यासाठी बचत गट ही चळवळ महिलांना प्रेरणा देणारी ठरली आहे. आपला राजमाता हा गट स्थापन होत आहे. यातून लवकरच आपणही गावातील महिलांना गृहउद्योग देऊन त्यांनाही सबलीकरनाच्या प्रवाहात आणू. तसेच महिलासाठी विविध योजना, वेगवेगळे कार्यक्रम घेऊ, वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्या गावातील महिलांपर्यंत पोहचविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. याकामी माझ्या गटातील सौ.छायाताई डेंगळे, सौ. मीराताई दुशिंग, सौ. धनश्रीताई पटारे, सौ.मीराताई अलवणे, सौ.ढगे ताई, सौ.मंदाताई बार्वेकर, सौ.राणीताई, सौ. नंदाताई ढोकणे, सौ. कमलताई ढोकणे यांच्या सर्वांच्या साहाय्याने आम्ही लवकरच एक मोठा प्रकल्प हाती घेत आहोत. यातुन नक्कीच गावातील महिलाही सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत