सावधान ! तर, जनता तुम्हाला घरी बसवले : राहुल पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सावधान ! तर, जनता तुम्हाला घरी बसवले : राहुल पाटील

उंबरे : प्रतिनिधी     तरुण हे देशाचे भवितव्य आहेत. गावातील तरुणांकडेही व्हिजन आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत छत्रपती प्रतिष्ठानने नवे च...

उंबरे : प्रतिनिधी
    तरुण हे देशाचे भवितव्य आहेत. गावातील तरुणांकडेही व्हिजन आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत छत्रपती प्रतिष्ठानने नवे चेहरे असलेल्या तरुणांना संधी द्यावी, ग्रामस्थ निश्चितच 'उगवत्या सूर्याला नमस्कार घालतील' असे मत युवक मतदार राहुल पाटील ढोकणे याने व्यक्त केले.                                                       आजचा  तरुण मतदार आणि त्याच्या अपेक्षा याबाबत राहुल पाटील म्हणाला, तरुणांना आज विकास हवा आहे. गावात व्यायामशाला, ग्रंथालय आणि चांगली शिक्षण सुविधा असायला हवी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असायला हवे,मात्र दुर्दैवाने याकडे  गावाचे आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत तरुण मतदारांना काय हवे आहे, त्यांना कोणता विकास अभिप्रेत आहे, हे पक्ष श्रेष्ठीनी समजावून घेण्याची गरज आहे. केवळ जातीपातीचे राजकारण करून घराणेशाही कायम ठेवण्यासाठी आम्हा तरुणांच्या भावनेशी खेळू नका. नवे चेहरे द्या,   सर्वसामान्य गरीब असला तरी चालेल मात्र त्याच्याकडे विकासाची कल्पना असावी, केवळ स्वार्थी नसावा, तुुम्ही  पैसा आणि घराणेशाही समोर ठेवून उमेदवार दिले तर माझयासारखा तरुण आणि गोरगरीब जनता चूक पुन्हा करणार नाहीत, असे माझे एक तरुण मतदार म्हणून वयक्तिक मत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत