होय, मी तिसऱ्या आघाडीसोबत : अशोकराव दुशिंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

होय, मी तिसऱ्या आघाडीसोबत : अशोकराव दुशिंग

उंबरे : प्रतिनिधी आगामी निवडणूक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन तयार केलेल्या आघाडीत मी एक सर्वसामान्य नागरिक म्...

उंबरे : प्रतिनिधी
आगामी निवडणूक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन तयार केलेल्या आघाडीत मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सहभागी असल्याचे मत शनेश्वर दूध संकलन केंद्राचे माजी चेअरमन अशोकराव दुशिंग यांनी व्यक्त केले. दरम्यान, मंडळाचे श्रेष्ठी जी जबाबदारी देतील, ती आपण प्रामाणिकपणे पार पाडू, असेही त्यांनी सांगीतले.  उंबरे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नागरिक  म्हणून आपले मत नोंदवताना दुशिंग म्हणाले, आज गावाचा काय विकास झाला ? हे मी सांगण्याची गरज नाही. सर्वाना ते माहिती आहे.त्यामुळे कुठंतरी आता बदल घडणे गरजेचे आहे. गावातील माझ्या तरुण मित्रांनी तिसरी आघाडी केली तर माझा त्यांना पाठिंबा आहे. मी फार मोठा नेता नाही किंवा माझ्याकडे मतांचा फार मोठा गठ्ठा नाही परंतु तरुणांच्या शक्तीवर आणि ग्रामस्थांच्या मनात असलेल्या सुप्त लाटेवर माझा विश्वास आहे. तुम्ही लढा, जनता तुमच्या सोबत असेल. या तिसऱ्या आघाडीचा ऐतिहासिक विजय होईल, मात्र पुढील पाच वर्षात तुम्हीही विकास कामे करून जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून दाखवा, असेही त्यांनी या आघाडीचे कान टोचले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत