उंबरे प्रभाग पाचमध्ये मोर्चेबांधणी सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरे प्रभाग पाचमध्ये मोर्चेबांधणी सुरू

उंबरे : उंबरे ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढतीची शक्यता असून प्रभाग क्रमांक पाच या प्रतिष्ठेच्या वार्डात आदिनाथ सेवा मंडळाकडून विद्यमान ...

उंबरे :


उंबरे ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढतीची शक्यता असून प्रभाग क्रमांक पाच या प्रतिष्ठेच्या वार्डात आदिनाथ सेवा मंडळाकडून विद्यमान उपसरपंच दत्तात्रय तरवडे, ओबीसीतून पूनम बाबासाहेब गोरे आणि जनरल महिला म्हणून कांचन संतोष ढोकणे यांची उमेदवारी अंतिम समजली जात आहे तर विरोधी आदर्श गाव विकास आघाडी कडून दीपक राजेंद्र ढोकणे, ओबीसीतून मंदाबाई बाळासाहेब बार्वेकर आणि जनरल ज्योती गोरक्षनाथ ढोकणे  यांची नावे आघाडीवर आहेत. तर, जनसेवा मंडळाकडून गंगाधर अडसुरे, ओबीसी छाया राजेंद्र उंडे आणि जनरल महिला सुनीता दत्तात्रय ढोकणे यांच्या नावाची चर्चा आहे.  सध्या आदिनाथ सेवा मंडळाने प्रचारात आघाडी घेतली आहे. मंडळाच्या श्रष्टींनी त्यांच्या तिन्ही उमेदवारांना दिलेले शब्द पाळत त्यांना तयारीला लागण्याचे सांगितले असल्याचीही चर्चा आहे, तर जनसेवा मंडळाचे उमेदवारही जवळ जवळ अंतिम आहेत, आदर्श आघाडितही उमेदवार अंतिम असल्याची चर्चा आहे, त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण वाजी मारेल। याची सर्वाना उत्सुकता आहे. मात्र ऐनवेळी कुणाचा पत्ता कट होणार यावरही बरेच गणित अवलंबून असणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत