मी ठरवलंय... तुम्हीही ठरवा ! किरण ढोकणे यांचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मी ठरवलंय... तुम्हीही ठरवा ! किरण ढोकणे यांचे आवाहन

उंबरे: प्रतिनिधी  राजकीय,  सामाजिक, धार्मिक,   क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात उंबरे गाव आघाडीवर आहे मात्र विकासाबाबत आपले गाव प्रचंड मागे अ...

उंबरे: प्रतिनिधी 
राजकीय, सामाजिक, धार्मिक,  क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात उंबरे गाव आघाडीवर आहे मात्र विकासाबाबत आपले गाव प्रचंड मागे असल्याची आम्हा तरुणांच्या मनात खंत आहे. आता पुन्हा निवडणूका येतील, तेच उमेदवार पुन्हा मते मागतील, पुन्हा आश्वासनेही दिली जातील, मात्र यावेळी आमचा तरुणवर्ग फसणार नाही, ज्यांचे गावासाठीं योगदान आहे, अशा सुशिक्षित तरुणांचं आम्ही निवडून देऊ, असे परखड मत युवा मतदारांचा आयडॉल किरण ढोकणे याने व्यक्त केले आहे.                                                            किरण म्हणाला की,  शाळेत पहिलीला असल्यापासून  'माझं गाव' हा निबंध लिहतोय,गावात टुमदार झाडी, त्याखाली असणारा पारा, घरोघरी मुबलक पाणी, परिसर स्वछता, मोठी बाजारपेठ, शिक्षणाची सुविधा, प्रशस्त दवाखाना, चांगले रस्ते असे माझे स्वप्नातील गाव. माझं कॉलेज पूर्ण झालं, तरीही 15 वर्षात माझ्या निबंधातील गाव अजूनही सापडलेले नाही, मला कुणाला दोष द्यायचा नाही, मात्र तरीही गावात ज्याने-त्याने  स्वार्थी राजकारण केल्यानेच गावाचा विकास खुंटला व स्वतःचा विकास मात्र केला गेला. गावात अजूनही अनेक सुविधा नाहीत, वायफाय सारख्या सोयी नाही, लॅबररी नाही, रस्ते धड नाही, असे असताना आता मते कुणाला द्यायची याबाबत विचार करावा लागणार आहे. आजच्या तरुणांनी  आपल्या भावी पिढीसाठी तरी गावाला चांगले कारभारी निवडून देण्याची गरज आहे. मी स्वतः पक्ष पाहणार नाही, मात्र जो नवा चेहरा आहे, जो सुशिक्षित आहे, ज्याच्याकडे व्हीजन आहे, ज्याच्यावर भ्रष्टाचार आरोप नाही अशा उमेदवारांना मत देणार असल्याचेही स्पष्ट सांगितले

1 टिप्पणी