मुस्लिम मुलीच्या लग्नाला हिंदूंची मदत ; राजुभाऊ ढोकणे यांनी जपला जातीय सलोखा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुस्लिम मुलीच्या लग्नाला हिंदूंची मदत ; राजुभाऊ ढोकणे यांनी जपला जातीय सलोखा

उंबरे : मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तो समाजशिवाय राहू शकत नाही, अशी अरिस्टोटलने मानवाविषयी मांडलेली संकल्पना आज काळाच्या ओघात खरोखरच ...

उंबरे :
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, तो समाजशिवाय राहू शकत नाही, अशी अरिस्टोटलने मानवाविषयी मांडलेली संकल्पना आज काळाच्या ओघात खरोखरच बदलताना दिसंत आहे.  मनुष्य स्वतःचे आयुष्य जगत असताना इतरांचे दुःख रडून ऐकताना आणि दुसऱ्याला हसून सांगतानाचे चित्र पहायला मिळते, अर्थात याला काही अपवादही आहेच, की जे दुसऱ्याचे दुःख आपले समजतात, दुसऱ्याचे संकट आपले समजतात व जातीपातीचे बंधने तोडुन केवळ माणुसकीतून त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे करतात, अगदी तसेच उंबरेचे राजाभाऊ ढोकणे हे देखील एक आहेत बर का!  एका मुस्लिम समाजाच्या गरजू व्यक्तीला मुलीच्या लग्नासाठी 11 हजाराची रोख मदत देऊन राजाभाऊनी सामाजिक सलोखा जपताना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.                                          संत गाडगे महाराजांनी देव माणसात शोधा, असा उपदेश केला तर संत तुकडोजी महाराजानी ग्रामगितेतून खरा माणुसकी धर्म शिकवला. आमचे राजाभाऊ ढोकणे यांनी या उपदेशाचा अनुग्रह करत आपले जीवन फुलविले. व्यवहार जपतानाच संकट समयी लोकांना मदतीचा हातही पुढे करण्यात ते मागे नाहीत. मळगंगा देवस्थानचे अध्यक्षपद भूषविताना त्यांनी अनेक सामाजिक कार्यही केली आहेत. देवीची यात्रा, कुस्ती आखाडा, अन्य कार्यक्रम त्यांनी  सुरू केली आहेत, मळगंगा पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकर्यांना अल्प पाणीपट्टीत शेतीसाठी पाणी दिले आहे. यावर न थांबता आपली सामाजिक जबाबदारी ओळखून त्यांनी नेहमीच गरजु लोकांना मदतीचा हात दिला आहे. दोन दिवसांपूर्वी एका मुस्लिम समाजातील व्यक्तीची आपल्या मुलीच्या लग्नासाठी धावपळ सुरू होती. परिस्थिती हलाकीची असल्याने तो हवालदिल झाला होता, आशा गोंधलेल्या अवस्थेत तो असताना राजेंद्र ढोकणे हे देवदूत बनुन त्याच्या मदतीला धावले. त्यांच्या कानावर ही बाब जाताच त्यांनी मुस्लिम समाजाच्या या व्यक्तीला घरी बोलावले. तो व्यक्ती आपल्या नातेवाईकासमवेत घरी आला आणि राजाभाऊंनी अनपेक्षित पणे 11 हजार रुपये हातात ठेवत हे मुलीच्या लग्नासाठी माझ्याकडून कन्यादान समज, असे मोठ्या मनाने सांगत पाठीवर हात टाकला. ना जातीचा ना धर्माचा मात्र तरीही ऐनवेळी आपल्याला 11 हजार रुपयांची मदत करणाऱ्या राजाभाऊकडे पाहून त्या मुस्लिम मुलीच्या दमलेल्या बाबाच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. यावेळी हे चित्र पाहून सर्वानाच गहिवरून आले होते. कट्टर हिंदू म्हणून ओळख असलेल्या राजुभाऊंनी जातीभेद विसरून मुस्लिम व्यक्तीला केलेली मदत आणि या घटनेतून एका हिंदूने मुस्लिम मुलीचे केले कन्यादान ही खरोखरच समाजासाठी एक जातीय सलोखा आणि माणुसकीची खरी शिकवण देणारी आहे, त्यामुळे आज राजूभाऊ ढोकणे यांचे मोठे कौतुक होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत