उंबरे: प्रतिनिधी गेल्या 25 वर्षांपासून उंबरे गावातील माळवाडीचा प्रभाग 3 हा पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे. येथे कुणीही यावं आ...
उंबरे: प्रतिनिधी
गेल्या 25 वर्षांपासून उंबरे गावातील माळवाडीचा प्रभाग 3 हा पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे. येथे कुणीही यावं आणि उभं रहावं आणि खोटी आश्वासने देऊन जनतेची मत घ्यावी अशीच परंपरा बनली आहे. त्यामुळे राजकीय लोकांनी भकास केलेल्या माळवाडीला विकास काय आहे ते दाखविण्यासाठी मी निवडणूक लढणार आहे, आता आर नाही तर पार, पण लढणारच अशी ठोस भूमिका युवानेते साहेबराव गायकवाड यांनी घेतली आहे. उंबरे गावातील एक भाग असलेल्या माळवाडीला कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत. पाण्याची टाकी आहे पण त्यात पाणी आणण्याचे काम 10 वर्षात कुणाला शक्य झाले नाही, येथे वीज नाही, रस्तेही धड नाहीत, येथे सुसज्ज दवाखाना नाही, मोठी बाजारपेठ नाही, ग्रामपंचायतीची मूलभूत अशी कामे नाहीत, हंडाभर पाण्यासाठी माझ्या माय बहिणी आपल्या चिमुरड्यांसोबत वणवण करताना पाहून माझे मन हेलावून जाते. मी त्यांचे दुःख आता आणखी पाहू शकत नाही. माझ्या प्रभागातील लोकांना वीज,पाणी, शिक्षण, आरोग्य या सुविधा देण्यासाठी मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. येथील मागासवर्गीय समाजाला बंधू सारखी वागणूक देणाऱ्या माझ्या हिंदू बांधवांच्या आशीर्वादाने मी मैदानात उतरणार आहे, अठरापगड जातींना सोबत घेऊन मी माझा हा लढा यशस्वी करून दाखवणार आहे. गेल्या 25 वर्षात जे झाले नाही ते मी साहेबराव गायकवाड जनतेला करून दाखवणार आहे. येथील माझा मागासवर्गीय समाज आजही पारतंत्र्यात असल्यागत आपल्या न्याय व हक्कासाठी लढत आहेत. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम मी करणार आहे, येथे छोटे मोठे उद्योग मी आणणार आहे, स्वतंत्र रेशन दुकान, आठवडे बाजार, आरोग्य उपकेंद्र, तरुणांसाठी जिम, सुलभ वाचनालय यासह रखडलेला पिण्याचा पाणी प्रश्न सोडवणे हे माझे जनतेला अभिवचन असणार आहे, फकत बोलणार नाही तर करून दाखवणार असल्याचेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत