उंबरे : प्रतिनिधी उंबरे ग्रामपंचायतीसाठी हालचालींना वेग आला आहे. प्रभाग पाच मधून जनरल उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत ...
उंबरे : प्रतिनिधी
उंबरे ग्रामपंचायतीसाठी हालचालींना वेग आला आहे. प्रभाग पाच मधून जनरल उमेदवार म्हणून सर्वाधिक चर्चेत असलेले दीपक उर्फ पप्पु ढोकणे यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आता फकत औपचारिकता बाकी असल्याचे ते सांगत आहेत. उंबरे गावातील प्रभाग 5 हा प्रतिष्ठेचा बनला आहे, निवडणुकीला अजून 3 महिने वेळ असला तरी इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत, यात तिसऱ्या आघाडीकडून चर्चेत असलेले पप्पू राजेंद्र ढोकणे हे देखील चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी काल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना अभिवादन करत आपली मोहीम उघडली आहे. काल जेष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी या निवडणुकीत उतरण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत