उंबरे : प्रतिनिधी उंबरे गावाच्या विकासासाठी आज तरुण वर्ग एकवटताना दिसत आहे, त्यामुळे मी देखील या लढ्यात सहभागी व्हावे, अशी काही तरुण...
उंबरे : प्रतिनिधी
उंबरे गावाच्या विकासासाठी आज तरुण वर्ग एकवटताना दिसत आहे, त्यामुळे मी देखील या लढ्यात सहभागी व्हावे, अशी काही तरुणांची इच्छा आहे. नुकतीच झालेली प्रभागाची रचना पाहता प्रभाग पाचमधून लढण्याचा मला एका गटाकडून आग्रह सुरू असला तरी मी प्रभाग 1 आणि 5 मधून अपक्ष लढणार असल्याचा गौप्यस्फोट युवानेते नारायण दादा ढोकणे यांनी केला आहे. नारायण ढोकणे म्हणाले की, उंबरे गावात तरुणांची आघाडी बनली आहे, ही कौतुकाची बाब आहे. मात्र गावाचा विकास हाच ध्यास असेल तर मी देखील यांच्या सोबत जाऊ शकतो, मात्र सध्या तरी असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही, मात्र गावाच्या हितासाठी मी प्रभाग पाच मधून निवडणूक लढवावी अशी काही तरुणांची भावना आहे, तर माझ्या जवळच्या मित्रांची मी प्रभाग 1 मध्ये लढावे अशी इच्छा आहे. त्यामुळे मी आताच कोणताही निर्णय घेणार नाही, सर्व सामान्य जनतेला विश्वासात घेऊनच काय तो निर्णय घेणार आहे. मात्र सध्या दोन गट माझ्या संपर्कात असले तरी मी त्यांना कोणताही शब्द दिलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर अपक्ष लढणार असल्याचेही त्यांनी छाती ठोकून सांगितले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत