उंबरे : प्रतिनिधी उंबरे गावातील प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने निवडणुकीपूर्वीच ये...
उंबरे : प्रतिनिधी
उंबरे गावातील प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने निवडणुकीपूर्वीच येथे मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे.नुकतेच या वार्डातील बापूसाहेब भाऊसाहेब ढोकणे यांनीही आपण अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. बापूसाहेब ढोकणे हे गावातील एक युवा व्यक्तिमत्व आहे. नेहमी हसतमुख चेहरा आणि मितभाषी स्वभाव असल्याने त्यांच्यामागे तरुणांची मोठी ताकद आहे. नेहमी मदतीसाठी तत्परता आणि मित्र परिवाराच्या सुख दुखात सहभागी होण्याची त्यांची प्रवृत्ती खरोखरच प्रशंसनीय आहे.त्यामुळे अनेक तरुणांनी बापू तू ही निवडणूक लढ अशी इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे बापूसाहेब ढोकणे यांनी जनतेच्या इच्छेखातर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे, बापु ढोकणे हे मुळात शिवसैनिक असल्याने त्यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळणार आहे, त्यामुळे त्यांना विजय शक्य असल्याचीही चर्चा आता गावात सुरू झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत