भारतभाऊ, निवडणूक रिंगणात ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भारतभाऊ, निवडणूक रिंगणात ?

उंबरे : प्रतिनिधी    संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उंबरे या नगरीत आपल्याही हातून जनतेची सेवा घडावी, या अपेक्षेने येणाऱ्या ग्रामपं...

उंबरे : प्रतिनिधी 
  संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उंबरे या नगरीत आपल्याही हातून जनतेची सेवा घडावी, या अपेक्षेने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मी उभा राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती युवानेते भारतभाऊ दरंदले यांनी व्यक्त केली.                                                            भारतभाऊ दरंदले यांनी वारकरी संप्रदायात भरीव काम केले आहे. गावातील दिंडी सोहळा, गणेशोत्सव, शिवजयंती, संत रोहिदास पुण्यतिथी, एकलव्य जयंती अशा सर्व जाती धर्माच्या कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा तयार झाली आहे. त्यांची अधिकारी वर्गाशी जवळीक असल्याने त्याचा गावाला फायदा होत असतो, सोनई पाणी योजना सुरू राहण्यासाठी भारतभाऊचे मोठे योगदान आहे. अनेकदा त्यांनी अधिकाऱ्यांना विनंती करून योजना सुरू ठेवल्याचे पहायला मिळाले आहे, याशिवाय त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान, आणि नेहमी हसतमुख चेहरा व लहान मोठयाबरोबर आपुलकीने बोलण्याची पद्धतअनेकांना मोहित करणारी आहे,  त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना प्रतिसादही चांगला मिळत असल्याने याबाबत मोठी चर्चा सुरू आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत