एक संधी द्या ; सोनं करून दाखवतो : अनिल ढोकणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एक संधी द्या ; सोनं करून दाखवतो : अनिल ढोकणे

उंबरे ः प्रतिनिधी  आज गावची अवस्था खूप वाईट आहे. वीज नाही, पाणी नाही, रस्तेही धड  नाहीत. आरोग्याच्या बाबतीतही  उदासिनता आहे,  श...



उंबरे ः प्रतिनिधी
 आज गावची अवस्था खूप वाईट आहे. वीज नाही, पाणी नाही, रस्तेही धड  नाहीत. आरोग्याच्या बाबतीतही  उदासिनता आहे,  शिक्षण क्षेत्रातही राजकारण घुसले आहे, निधीचा योग्य विनियोग होत नाही, अशा या चक्रव्यूहात गावचा ‘विकास’ अडकला आहे. हा विकास पूर्वपदावर आणण्यासाठी  प्रभाग क्रमांक 4 मधून मी निवडणूक लढणार असल्याची घोषणा युवानेते तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अनिल ढोकणे यांनी केली.ग्रामस्थांनो, मला फकत एक संधी द्या, मी गावचा विकास करून या संधीचे सोने करून दाखवतो, असेही त्यांनी शेवटी सांगितले
   अनिल ढोकणे म्हणतात की, मला पराभवाची भिती अजिबात वाटत नाही. माझ्या घराण्यातील कोणीही सरपंच किंवा उपसरपंच अशी जबाबदारीची पदे भोगलेली नाहीत. त्यामुळे मी निवडणूक लढलो आणि त्यात पराभूत झालो तरी काहीही फरक पडणार नाही. मात्र, गावच्या विकासासाठी मी नैतिक जबाबदारी म्हणून एक प्रयत्न करणार आहे.
मी जनतेसमोर माझे ‘व्हिजन’घेवून येणार आहे. यामध्ये सर्वांना त्यांचे मुलधूत अधिकारी देण्यासाठी मी वचनबद्ध असेल. याशिवाय गावातील सर्व सोयीसुविधा पुरविण्यासाठी मी त्यांना कटीबद्दध असणार आहे. माझा वचननामा मी लवकरच प्रसिद्ध करणार आहे. जनतेला तो नक्कीच आवडेल आणि आतापर्यंत अनेकांना संधी दिली आता नव्या चेहर्‍याला तसेच ‘विकासाला’ संधी देण्यासाठी मला जनता  निवडूण देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सध्यातरी माझी तयारी अपक्ष लढण्याची असली तरी छत्रपती प्रतिष्ठाणकडून मला ऑफर आली आहे. याशिवाय भाजप, सेनेच्या आघाडीचाही पर्याय माझ्यासाठी खुला असल्याचे ढोकणे म्हणाले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत