उंबरे : प्रतिनिधी उंबरे गावाशी संलग्न असलेल्या आणि जम्मू काश्मीर प्रमाणेच उंबरे गावचे नाक समजल्या जाणाऱ्या माळवाडी भागाचा विकास करण्यात ...
उंबरे : प्रतिनिधी
उंबरे गावाशी संलग्न असलेल्या आणि जम्मू काश्मीर प्रमाणेच उंबरे गावचे नाक समजल्या जाणाऱ्या माळवाडी भागाचा विकास करण्यात सत्ताधार्यांना अपयश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा भाग दुर्लक्षित आहे, या भागाला सर्व सोयीसुविधा देऊन न्याय देण्यासाठी मी प्रभाग 3 मधून निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याची घोषणा शिवसैनिक शिवाजी पटारे यांनी केली. शिवाजी पटारे हे मूळ शिवसैनिक आहेत, माळवाडी आणि परिसरात त्यांनी शिवसेना वाढीसाठी मोठेप्रयत्न केले आहेत. 15 वर्षांपूर्वी गावात शिवसेनेची सत्ता आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.मात्र त्यावेळी पुरेसा निधी नसल्याने या भागाचा अपेक्षित विकास झाला नाही, मात्र आता कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही माळवाडी च्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.या भागात रस्ते नाहीत, वीज नाही, आरोग्य सुविधा नाही, आणि साधं प्यायला पाणी देण्यासही ग्रामपंचायतीला अपयश आले आहे. त्यामुळे यांना या भागात येऊन मते मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही, ही परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी पटारे यांनी शिवसेना, भाजप आणि छत्रपती प्रतिष्ठान व डॉ, रामकृष्ण ढोकणे फौंडेशन यांच्या गाव विकास आघाडीकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कैलास अडसुरे यांच्याकडे त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे, पटारे यांनी निवडणूक लढवली तर नकीच याचा या भागाला विकासासाठी फायदा होणार आहे

1gbdata
उत्तर द्याहटवा