उंबरे ः उंबरे ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून दोन वर्षापुर्वी मंजूर झालेल्या जिमसाठीचा 3 लाख 80 हजार रुपयांचा निधी आठ दिवसात ...
उंबरे ः
उंबरे ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून दोन वर्षापुर्वी मंजूर झालेल्या जिमसाठीचा 3 लाख 80 हजार रुपयांचा निधी आठ दिवसात न वापरल्यास तीव्र आंदोलन छेडल जाईल, असा इशारा शिवसेना व छत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात आला आहे ग्रामसेवक शेख यांनी शब्दाला जागून 22 अपंगांना प्रत्येकी 4100 रुपयांप्रमाणे साहित्य दिले आहे. त्यांचेही शिवसेना व छत्रपती प्रतिष्ठाणने अभिनंदन करून धन्यवाद दिले आहेत. मात्र, त्यांनी आता जीमचा शब्दही पूर्ण करावा, असेही तरूणांनी म्हटले आहे.
उंबरे येथे 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून विजया नानासाहेब ढोकणे सरपंच असताना तरूणांना जीमसाठी निधीची तरतूद केली होती. मात्र, हा निधी अद्यापपर्यंत वापरला गेलेला नाही. यापुर्वीही अनेकदा ग्रामसभेत याविषयी लक्ष वेधण्यात आले होते. तसेच गावातील तरूणांनीही ग्रामपंचायतीला मंजूर झालेली जिम का आणून देत नाहीत ? असा जाब विचारला होता. त्यावर पंधरा दिवसात जीम आणू देवू अशी ग्वाही ग्रामसेवक शेख यांनी दिली होती. त्यामुळे आता मंजूर झालेली जीम तत्काळ उपलब्ध करून दिल्यास, ग्रामसेवक शेख यांचा तरूणांकडून जाहीर सत्कार केला जाणार आहे. मात्र, जीम देण्यास टाळाटाळ झाल्यास ग्रामपंचायतीवर कवट्या महाकालचे मुखवटे घालून ‘कवट्या महाकाल’ या नावाने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कैलास अडसुरे, छत्रपती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष लक्ष्मण पटारे, गोरक्षनाथ शेजूळ, गोरक्षनाथ ढोकणे, गणेश तोडमल आदींनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत