जिथं किंमत नाही , तिथं थांबणार नाही ! घाडगे तिसऱ्या आघाडीच्या गोटात दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिथं किंमत नाही , तिथं थांबणार नाही ! घाडगे तिसऱ्या आघाडीच्या गोटात दाखल

उंबरे :  उंबरे ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला जनतेने संधी दिली, त्यात श्रेष्ठींनीही आमच्यावर विश्वास दाखवला, मात्र आम्ही नेत्यांशी आणि पार्...

उंबरे : 

उंबरे ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला जनतेने संधी दिली, त्यात श्रेष्ठींनीही आमच्यावर विश्वास दाखवला, मात्र आम्ही नेत्यांशी आणि पार्टीशी एकनिष्ठ राहूनही आमच्यावर अन्याय झाल्याची सल माझ्या मनात कायम आहे. त्यामुळेच या पंचवार्षिकला मी जुने नेते सोडून थेट तिसऱ्या आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची भावना अर्जुन पाटील घाडगे यांनी व्यक्त केली.     घाडगे म्हणाले, गेल्यावेळी आम्हाला जनतेने संधी दिली मात्र गोरगरीब जनतेची कामे करण्यात अनेक अडचणी आल्या, आमचा स्वभाव भांडण्याच्या नाही, ज्याच्याबरोबर राहू त्याच्याशी प्रामाणिक राहू अशी आमची संस्कृती आहे, मात्र याचाच काही लोकांनी फायदा घेतला आहे, अनेक निवडीत आम्हाला शब्द देऊन फसविले आहे, आमच्यावर जाणीव पूर्वक अन्याय केला आहे,  आमच्या घराण्यात पद आले असते तर जनतेची कामे करता आली असती मात्र हे होऊ शकले नाही, यांची माझ्या मनात खंत आहे, असो, आता पाच वर्षे संपणार आहेत, आता किमान माझ्यावर तरी कुणाचे बंधन नाही,  त्यामुळे मी स्वतः किंवा माझी सौभाग्यवती मीरा घाडगे निडणुकीला सामोरे जाणार आहोत, त्यासाठी तिसऱ्या आघाडीकडून मी इच्छुक आहे, त्यासाठी मी स्वतः भाजप, शिवसेना, छत्रपती प्रतिष्ठान यांचा मेळ घालून देणार आहे, आता काहीही झाले तरी चालेल मात्र माझी उमेदवारी जनतेसाठी अंतिम असेल, यापुढे अन्याय सहन करणार नाही.शेवटचे तीन महिने राहिले तरी नेते अन्याय करत असतील तर जिथे आपल्याला किंमत नाही, तेथे थांबून काय उपयोग, असेही घाडगे यांनी म्हटले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत