'आवाज जनतेचा' संपादक पदी सौ. सोनाली शेजुळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'आवाज जनतेचा' संपादक पदी सौ. सोनाली शेजुळ

अहमदनगर : प्रतिनिधी        सध्या सोशल मीडियाचे युग आहे, जनतेचा सर्व कल हा देखील सोशल मिडियाकडे झुकताना दिसत आहे, त्यामुळे उंबरे गावातून...

अहमदनगर : प्रतिनिधी     
  सध्या सोशल मीडियाचे युग आहे, जनतेचा सर्व कल हा देखील सोशल मिडियाकडे झुकताना दिसत आहे, त्यामुळे उंबरे गावातूनही सर्वसामान्य जनतेसाठी 'आवाज जनतेचा' हे न्युज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या संपादक पदी सौ. सोनाली गोरक्षनाथ शेजुळ यांची निवड केल्याची माहिती संचालक संपादक के. एस भोपे यांनी दिली.   15 मार्च पासून त्या पदभार स्वीकारणार आहेत                            महिलांना कोणत्याही क्षेत्रात संधी मिळाली तर त्यात त्या आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करतात, महिला दिनाच्या निमित्ताने आम्हीही महिला संपादिका देऊन महिलेचा सन्मान करण्याचे ठरवले आहे, दोन दिवसांपूर्वी सामनाच्या संपादक पदीही रश्मी ठाकरे या महिलेला संधी देण्यात आली आहे, त्यामुळे महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दिसत आहे.                                            8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना सन्मान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.  गावातील प्रश्न किंवा जनतेच्या भावना प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे काम 'आवाज जनतेचा' करणार आहे. सामाजिक बांधीलकीतून जनतेसाठी हे हक्काचे व्यासपीठ दिलेले आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या समस्या, आपल्या प्रतिक्रिया पाठवून सहकार्य केल्यास हा 'जनतेचा आवाज'' मंत्रालयापर्यंत जाण्यास वेळ लागणार नाही. यातून नक्कीच विकासास हातभार लागेल, अशी आम्हाला खात्री आहे. एवढ्यावर समाधान न मानता महिलांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक महिला संपादीका देऊन महिलांनाही हे व्यासपीठ खुले केले आहे. सोनालीताई या उच्चशिक्षित आहेत, त्यांना त्यांचे पती उपसंपादक शेजुळ यांचेही मार्गदर्शन असणार आहे. या माध्यमातून आपले पोर्टल नक्कीच यशस्वी होईल, व यातून जनतेचा खरा आवाज बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत