उंबरे : प्रतिनिधी उंबरे माळवाडी हा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती महिला आरक्षणातून स्वाती साहेबराव गायकवाड यांना छत्...
उंबरे : प्रतिनिधी
उंबरे माळवाडी हा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती महिला आरक्षणातून स्वाती साहेबराव गायकवाड यांना छत्रपती प्रतिष्ठान कडून उमेदवारीचा ग्रीन सिग्नल मिळाल्याने त्यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते साहेबराव गायकवाड यांच्या सौभाग्यवती असलेल्या स्वातीताई ह्यांनाही पती प्रमाणेच गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याची आवड आहे. महिला बचत गट, महिला संघटना या माध्यमातून त्यांनी माळवाडी येथे महिलांचा मोठा गट तयार केला आहे, मात्र हे काम करत असताना आजही महिला पाण्यासाठी अनवाणी वणवण फिरताना पाहून त्यांना याचे मोठे दुःख वाटते, आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या वार्डातील समस्या सोडविण्यासाठी आता मीच ग्रामपंचायतिमध्ये जाते व आपल्या भागात कसकाय कामे होत नाही हेच मी पाहते, अशा आत्मविश्वासाने त्यांनी आपले पती साहेबराव गायकवाड यांच्याकडे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता तुम्ही थांबा, मीच माझ्या भगिनींचे प्रश्न सोडवते असे त्या सांगत आहेत, त्यामुळे छत्रपती प्रतिष्ठाननेही त्यांच्या उमेदवारीला प्रथमिक पाठींबा देऊन कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत, आता उमेदवारी अंतिम समजली जाते असल्याने या जोडीने प्राथमिक भेटीगाठी सुरू केल्या आहेत, शिवाय स्वाती गायकवाड या बहिणीमागे अनेक भाऊ आणि माय भगिनीही उभ्या राहणार आहेत, त्यामुळे याच ताकदीच्या बळावर त्यांना ही निवडणूक जिंकणे शक्य होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत