संकल्प करा नारीच्या सन्मानाचा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संकल्प करा नारीच्या सन्मानाचा

उंबरे : सोनाली शेजुळ                       महिला दिन सर्वच ठिकाणी साजरा केला जाताे. दरवर्षीच ताे साजरा केला जात असून प्रत्येकजण या दि...


उंबरे : सोनाली शेजुळ

                      महिला दिन सर्वच ठिकाणी साजरा केला जाताे. दरवर्षीच ताे साजरा केला जात असून प्रत्येकजण या दिवशी अापले विचार मांडून महिलांचा सन्मान करीत असतात. परंतु हा सन्मान महिलांचा एक दिवसापुरताच मर्यादीत असताे. ताे कायम व्हावा, असा संकल्प महिलादिनी हाेणे गरजेचे आहे.
   आज मर्हिलादिन सर्वच ठिकाणी उत्साहात साजरा केला जाताे. या दिनानिमित्ताने प्रत्येकजण महिलांच्या कार्याचा उल्लेख करून महिलांना चांगल्या संधी मिळावी, अशी भाषणे ठाेकताे. प्रत्यक्षात मात्र महिलांचे खच्चीकरण करण्याचा उद्दाेग वर्षभर करणारेच अशी भाषणे ठाेकत असतात. ही वृत्ती बदलायची असेल तर महिलांना अधिकाधिक कार्यक्षम करून त्यांना सुरक्षीत वाटले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपली अाई, अापली बहिण, अापली भावजयी असे समजून प्रत्येकाने महिलांवर हाेणार्या अन्यायाविराेधात अावाज उठवून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. अाज अनेक महिला न्यायासाठी लढत असल्या तरी त्यांना काही केल्या न्याय मिळत नाही. अशा अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळून देण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला तर महिलांवरील अन्यायाच्या घटनांना वेळीच लगाम लागू महिल मुक्तपणे अापली बाहेर सुरक्षीत फिरू शकतील.
सर्वांनीच महिला दिनी संकल्प करणे गरजेचे अाहे. अाज समाजामध्ये महिलांना कमी लेखले जात अाहे. त्यामुळेच महिलांची प्रगती खुटंललेली आहे. अशा प्रवृत्तीला महिलांनी जाहीर निषेध करून त्यांना धडा शिकवणे गरजेचं आहे. असा उपाय केला तर महिलांचा अवमान करणार्यांची संख्या कमी हाेऊन सन्मान करणारे वाढतील.
संकल्प करू या महिला दिनी
सुरक्षीत जीवन त्यांना जगू देण्याचा
त्यांच्यावर हाेणार्या अन्याय अत्याचाराच्या
घटना राेखण्यासाठी पुढाकार घेण्याचा
सन्मानाने महिलांना जगू देण्याचा
एक दिवसाचा नव्हे तर कायम स्वरुपी
महिला दिन साजरा करण्याचा
संकल्प करून शपथ घेऊ या
महिलांवर अन्याय दूर करण्याचा...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत