पोपटच्या पत्नीला नोकरी देणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल...! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पोपटच्या पत्नीला नोकरी देणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल...!

उंबरे :  सचिन शेजुळ गेल्या सहा वर्षापासून पती आजरपणाशी लढत असताना ‘ती’ हरली नाही, खचली नाही, तर उलट पतीला आजारपणातून बाहेर काढण्यासाठी त...

उंबरे :  सचिन शेजुळ
गेल्या सहा वर्षापासून पती आजरपणाशी लढत असताना ‘ती’ हरली नाही, खचली नाही, तर उलट पतीला आजारपणातून बाहेर काढण्यासाठी तिने परिस्थितीशी दोन हात केले. पतीचा औषधोपचार, कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने सक्षमपणे प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, मोठे प्रयत्न करूनही दुर्दैवाने पतीचं निधन झाले. आता मात्र ‘ती’ खचली आहे. पोटची दोन मुलंही वडीलांचे छत्र हरपल्याने पोरकी झाली आहेत. अशावेळी या कुटूंबाला मदत करण्यासाठी पतीच्या जागेवर ‘तिला’ कायमस्वरूपी नोकरी देवून या कुटूंबाला आधार देण्याची गरज आहे.महिला दिनानिमित्त आज सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत, महिला सन्मान सुरू आहेत, अशावेळी या महिलेलाही आधार देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे
उंबरे येथील चर्मकार समाजातील पोपट काशीनाथ देव्हारे हे तनपुरे कारखाना संलग्न श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये ‘शिपाई’ म्हणून सेवेत होते. सतत हसतमुख आणि मनमिळावू स्वभाव असल्याने ते शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्येही ‘मामा’ं म्हणून प्रसिद्ध होते. ब्राम्हणी, टाकळीमिया शाळेत पोपट देव्हारे यांनी सेवा केली. दुर्दैवाने सहा वर्षापुर्वी पोपटला आजारपणाने विळखा घातला. यामुळे कुटुंब अडचणीत सापडले. मात्र पत्नीनेही पै पै गोळा करून औषधोपचाराचा खर्च उचलला. त्यात बंधू मच्छिंद्र देव्हारे यांनीही आपल्या भावासाठी जीवाचं रानं केलं. खूप प्रयत्न केले. त्यातून पोपट सावरला खरा पण नियतीच्या चक्रातून तो पूर्णपणे बाहेर येवू शकला नाही.
पोपटला माणुसकीच्या नात्याने सर्वांनी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण प्रसारक मंडळ असेल किंवा कारखान्याचे संचालक मंडळाने पोपटच्या कुटूंबाला मदत केलेली आहे,. आता पोपटच्या मृत्युनंतर आपला एक कर्मचारी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना शिक्षण मंडळ पदाधिकार्यत निर्माण झाली आहे. पोपटच्या अंत्यसंस्कार आणि दशक्रियाविधीच्या उपस्थितीवरून हे पहायलाही मिळाले आहे. मात्र आता दशक्रियाविधी झाला..पुढे काय ?
पोपटच्या मागे पत्नी आहे, त्याला दोन चिमुरडेही आहेत.  एक गोजिरवाना मुलगा आणि एक गोंडस अशी मुलगी आहे. या कुटूंबाचे पुढचं भवितव्य काय आहे. कदाचित, अनुकंपाखाली तिला नोकरी मिळेलही मात्र त्याला किती दिवस लागणार हे कुणीही सांगू शकत नाही, त्यासाठी तनपरे कारखान्याचे सर्वेसर्वा खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘तिला’ उंबरे हायस्कूलमध्ये कायमस्वरूपी कामावर हजर करून सामाजिक आणि मानसिक आधार देण्याची गरज आहे. खा, डॉ सुजयदादा विखे पाटील निश्चितच पोपटच्या कुटुंबासाठी एक देवदूत म्हणून मदतीला येतील, अशी खात्री ग्रामस्थांना आहे. पोपटच्या निधनानंतर त्यांना संस्थेने श्रद्धांजली अर्पण केली असली तरी, आता या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांच्या पत्नीला नोकरी देऊन हातभार लावण्याची गरज आहे, हीच पोपटला खरी श्रद्धांजली ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत