उंबरे : सोनाली शेजुळ आईने आपल्याला चांगले संस्कार दिले, चांगली शिकवण दिली, मार्गदर्शन केलं, स्वतः उपाशी राहिली मात्र आपल्या...
आईने आपल्याला चांगले संस्कार दिले, चांगली शिकवण दिली, मार्गदर्शन केलं, स्वतः उपाशी राहिली मात्र आपल्याला पोटभर जेवण दिले, लहानाचे मोठे केले, चांगले शिक्षण दिले, त्यामुळेचं आज आपण जे काही यश मिळवले आहे, ते शक्य झाले हे विसरून चालणार नाही, या निष्पाप आईचे आपण कधीच उपकार फेडू शकत नाही, मात्र तिच्या या उपकाराची कृतज्ञता तर व्यक्त करू शकतो ना ? खरतर आपण स्वतः सामाजिक काम करत असलो तरी महात्मा फुले किंवा सावित्री कधीच बनू शकत नाही, मात्र आपल्या जीवनात काही चांगले काम केले तर त्याचे निश्चितच मनाला खूप समाधान वाटते. आज आपल्या गावातील महिलांचा सन्मान होत आहे, कुणाची आई, कुणाची चुलती तर कुणाची ती पत्नी असणार आहे, त्यामुळे आपल्या माणसांच्या सन्मान सोहळ्याला आपण आवर्जून हजर असायला हवे की नाही ? म्हणतात ना दुसऱ्याच्या सुखात आनंद शोधता आला पाहिजे , तो आज आम्हाला मिळतो आहे, तो तुम्हालाही मिळेल, मात्र त्यासाठी आयुष्यातील एक तास आजच्या कार्यक्रमासाठी काढा, हीच विनंती! ( डॉ, सारिका रामकिसन ढोकणे, अश्विनी ज्ञानदेव क्षीरसागर, ज्योतीबगोरक्षनाथ ढोकणे, योगिता प्रमोद ढोकणे आदींच्या माध्यमातून पुढही हा कार्यक्रम सुरूच असणार आहे, दरवर्षी 101 महिलांचा सन्मान होणार आहे) सहभागी व्हावे, हीच अपेक्षा
येथे आज रविवार दि. 15 मार्च रोजी डॉ. राम ढोकणे फौंडेशन व छत्रपती प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने सिनेअभिनेत्री प्रिया गिमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श महिला सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
हनुमान मंदीरासमोर ह.भ.प. कोळी काकी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अनुराधा ठाकरे, मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष विद्या करपे व प्रतिभा संचलित केंद्राच्या वैशाली धसाळ आदींच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.
या सोहळ्यात पाककला स्पर्धा, केशरचना स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, उखाणे,होममिनीस्टर तसेच मिसेस उंबरे या स्पर्धा होतील. या स्पर्धेतील विजेत्यांना पैठणी बक्षिस मिळणार असल्याची माहिती ग्लोबल स्कुलच्या संचालिका प्रा.. सारीका ढोकणे यांनी दिली.
दरम्यान, कार्यक्रमात गावातील विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवलेले तसेच खासगी, सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींच्या मातांना, याशिवाय ज्या महिला विविध पदावर काम करतात त्यांचाही सन्मान करण्यात येणार असल्याचे ज्योती गोरक्षनाथ ढोकणे व सोनाली गोरक्षनाथ शेजूळ यांनी सांगितले.कार्यक्रमास अदिती कलेक्शनच्या संचालिका सितल गणेश डौले तर योगिता प्रमोद ढोकणे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास जास्तीत महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागतोत्सुक अश्विनी ज्ञानदेव क्षीरसागर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत