(श्रीरामपूर ः राष्ट्र सह्याद्री ) बनावट लग्न ला वून लाखो रुपयांना गंडा घालणारे रॅकेट शहरात उघडकीस आले आहे. अशा प्रकारे खोटा विवा...
(श्रीरामपूर ः राष्ट्र सह्याद्री ) बनावट लग्न लावून लाखो रुपयांना गंडा घालणारे रॅकेट शहरात उघडकीस आले आहे. अशा प्रकारे खोटा विवाह लावून येथील तरुण व्यापाऱ्याची पावणेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बेलापूर रस्त्यावरील आशीर्वादनगरमध्ये राहणाऱ्या सुमीत कैलास पांडे (वय 34) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राहुल रजपूत ऊर्फ कल्याण फकीरराव राऊत, नीता (पूर्ण नाव समजले नाही, रा. पुंडलिकनगर, औरंगाबाद) व मेधा संजय कटारिया व अश्विनी कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
जनरल स्टोअर असलेल्या सुमीत पांडे यांची औरंगाबाद येथील लग्न जमविणाऱ्या राहुल रजपूत ऊर्फ कल्याण राऊत याच्याशी चार महिन्यांपूर्वी भेट झाली. "जैन समाजातील एका मुलीचे आई-वडील लहानपणीच मृत पावले आहेत. काकांनी तिचा सांभाळ केला आहे. तिचा विवाह करायचा आहे,' असे राऊतने सांगितले. त्यानंतर या रॅकेटमधील एकाने पांडे यांच्याशी बोलणी केली.

19 जानेवारी रोजी मुलीसह चौघे शहरात आले. त्यांनी पांडे व त्यांच्या नातेवाइकांशी बोलणी केली. त्याच दिवशी केशव गोविंद बनात साध्या पद्धतीने विवाह लावण्यात आला. त्यासाठी या चौघांनी सव्वादोन लाखांची रक्कम घेतली. तसेच नवरीच्या अंगावर सोन्या-चांदीचे दागिने घालण्यात आले होते. लग्न लागल्यानंतर नवरीला घेऊन ते औरंगाबादला गेले. नंतर नवरी नांदायला आलीच नाही.
पांडे यांनी संपर्क करूनही उपयोग झाला नाही. अखेर ते नातेवाइकांसह औरंगाबाद येथे रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील राऊतच्या घरी गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नवरीच्या मैत्रिणीची आई वारली, असा बहाणा केला. नंतर मात्र त्यांनी तुमचा विवाहच झालेला नाही, असा पवित्रा घेतला.

विवाह लावणाऱ्या या रॅकेटने पांडे यांना सुमारे पावणेचार लाख रुपयांना गंडा घातला. अखेर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या रॅकेटमधील आरोपींची नावेही बनावट असून, नवरीदेखील बनावट असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत