घाम गाळून पिकवले मोती, आयुष्यभर टिकवले नाती, संस्कारांची दिली शिदोरी, दादा, पुन्हा या माघारी ...! उंबरे या छोट्याशा गावात एक प...
घाम गाळून पिकवले मोती, आयुष्यभर टिकवले नाती, संस्कारांची दिली शिदोरी, दादा, पुन्हा या माघारी ...! उंबरे या छोट्याशा गावात एक प्रामाणिक, मेहनती आणि वाडवडिलांपासून संस्काराची देणगी लाभलेले आदर्श कुटुंब म्हणजे हापसे कुटुंब होय. या कुटुंबातील विश्वनाथ हापसे हे एक आदर्श व्यक्तिमत्व होत, त्यांना वडील नामदेवराव यांच्याकडून कष्ट आणि परिश्रमाचे बाळकडू मिळाले होते. खरतर घरची परिस्थिती हलाकीची असतानाही त्यांनी जिद्द आणि प्रचंड मेहनतीने या परिस्थितीवर मात केली. माझं वय कमी असले तरी आमच्या शेजुळ घराण्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, आमचे आजोबा गंगामामा यांच्याशी त्यांची चांगली सोबत असायची असे आजही मला घरातील सदस्य सांगतात. विश्वनाथ उर्फ विष्णू याना सर्व आदराने दादा म्हणून हाक मारायचे,शून्यातून जग निर्माण करनारे हे 'दादा' होते, घरी वडिलोपार्जित थोडीफार जमीन होती, मात्र त्यात मोठे कुटुंब, सर्व कुटुंबाचा भार दादांवर होता, मात्र ते हा भार सांभाळताना कधीच खचले नाहीत.उलट सर्व भावांना विश्वासात घेऊन त्यानी परिस्थीतीशी दोन हात केले. घरची शेती करून त्यांनी मजुरीही केली. कधीच थकले नाहीत, अहोरात्र मेहनत घेतली, दिवसाची रात्र केली, याकामी त्यांना पत्नीचीही मोलाची साथ लाभली. पुढे या दाम्पत्याला चार मुले आणि दोन मुली झाल्या, कुटुंब वाढले मात्र दादांचे कष्ट सुरूच होते, त्यांनी मुलांवर लहानपणापासून संस्कार घडवले. कष्ट, प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द कधीही मोडू नका ही त्यांची दिलेली शिकवण, या शिकवणीवर आणि दादांनी घालून दिलेल्या वाटेवरून ज्ञानदेव, सोपान, बाळासाहेब आणि सुखदेव ही चार मुले वाटचाल करू लागली, दादांनी स्वतःच्या बळावर जमिनी विकत घेतल्या, दादांच्या घामाचे चीज व्हावें, म्हणून या चारही मुलांनी कष्ट करून ही शेती फुलवली, त्यात मोती पिकवले, शेती वाढवत दादांच्या स्वप्नांना बळ दिले, आज ज्ञानदेव आणि सोपान यांनी प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवला तर बाळासाहेब यांनी पोलीस दलात सेवा करण्याचे व्रत बांधले, खरतर बाळासाहेबांना पोलीस दलात जाण्याची प्रेरणाच ही वडिलांपासून मिळाली,आपल्या मुलाने पोलिसात जाऊन जनतेची सेवा करावी, असे त्यांना नेहमी वाटत होते, त्यामुळेच बाळासाहेबांनी दादांचे हे स्वप्न साकार करत एका चांगल्या मुलाचे कर्तव्य पार पाडले, तर सुखदेव या लहान मुलानेही शिक्षण या पवित्र क्षेत्रात प्राध्यापक म्हणून ज्ञानदान करण्याचा वसा घेतला,म्हणून आज एक सुशिक्षित आणि कष्टकरी कुटुंब म्हणून या हापसे कुटुंबाकडे पाहिले जाते.कधीच गर्व नाही, प्रचंड माणुसकी असलेले हे कुटुंब, दादांप्रमाणेच या चारही मुलांच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असल्याने हे कुटुंब आज गावात एक आदर्श कुटुंब आहे, मात्र मोट्या आनंदात जगणाऱ्या या कुटुंबावर चार दिवसापूर्वी मोठा आघात झाला, कुटुंबाचे मजबूत छत्र असलेले दादा अचानक सर्वाना सोडून गेले, मध्यतरी दादा आजारी असताना त्यांच्यासाठी धावपळ करणारी आज चारही मुले पोरकी झाली आहेत, अगोदरच मातृछत्र हरपले असताना दादांनी त्यांना आईची उणीव कधीच भासू दिली नव्हती,त्यामुळे दादांचे निधन हे मनाला दुःख पोहचवणारे आहे,दादांच्या निधनाने हापसे कूटबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, दादांच्या प्रत्येक आठवणीने हे कुटुंब आज अश्रू ढाळत आहे, दादा, तुम्ही पुन्हा या...! या भावनेतून त्यांची ही चार मुले, सुना, नातवंडे आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत आहेत मी अनेकदा त्यांच्याशी जवळून गप्पा मारल्या, दाढीसाठी दुकानात आल्यावर ते मला नेहमी जुना काळ, त्यावेळची परिस्थिती,त्यांनी घेतलेले कष्ट, अनेक प्रसंग , जीवनातील चढ उतार एकूण मन सुन्न होत असे, तसेच दादा नेहमी म्हणत की पोरानो, आईबापाला कधी विसरू नका, दिलेला शब्द मोडू नका, कष्ट करण्याची तयारी ठेवा, तरच सर्व काही मिळेल, असे ते सांगत होते, त्यामुळे दादा आमच्यासाठीही एक आदर्श होते, दादांच्या निधनाने आमच्या शेजुळ कुटूबाकडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत