उंबरे : प्रतिनिधी कोरोनाचा सर्वत्र कहर पसरला आहे. दररोज संशयित रुग्णांची संख्याही वाढती आहे. याशिवाय अफवांचा बाजारही जोमात आहे. ...
उंबरे : प्रतिनिधी
कोरोनाचा सर्वत्र कहर पसरला आहे. दररोज संशयित रुग्णांची संख्याही वाढती आहे. याशिवाय अफवांचा बाजारही जोमात आहे. त्यामुळे बाहेरगावी असलेले नोकर-चाकर पुन्हा आपल्या गावाकडे वळले आहेत. अशाच पद्धतीने एक तरूणही आपल्या बायकोसोबत गावाकडे आला खरा मात्र गावकर्यांनी त्याला गावच्या बसस्थानकावरच अडवून गावात पाय ठेवायचा नाही, असा इशाराच दिला. आता खरचं ही गावची लोकं कोरोनाला घाबरली म्हणून या तरूणाला त्यांनी गावात यायला विरोध केला की यामागे अन्य काही कारण होतं.. ? याबाबत सर्वांची जिज्ञासा तशी वाढलीच होती.
खरतंर, या तरूणाच्या आई-वडीलांनी त्याला लहानाचं मोठं केल. दोघांनी मोठे काबाडकष्ट घेतले, पोटाला चिमटा काढून त्याला शिकवल, मोठं केलं. नव्हे नव्हे तर त्याला पुण्याला नोकरी लागल्यानंतर गावाच्या कोपर्यात असलेली दोन गुंठे जागा विकून त्याला तिथे खर्चायला पैसेही दिले. तेव्हापासून तो तरूण तिकडे गेला तो तब्बल 9 वर्षे पुन्हा गावकडे परतलाच नाही. या कालावधीत त्याने आपल्या नोकरीवर बक्कळ पैसा कमविला, स्वतःच लग्नही केल आणि तिकडेच रमला. इकडे मात्र आपल्या एकुलत्या एक मुलाची वाट पाहताना ही दोघेही वृद्ध मातापिता खचून गेले होती. अशातच या वृद्ध वडीलांना एक दिवस छातीत चमक निघाली आणि घरी एकटया असलेल्या माय माउलीची पळापळ झाली. यावेळी गावातील काही लोकांनी तात्काळ या वृद्धास हॉस्पिटला हलविले. तिथे डॉक्टरांनी त्यांची अॅन्जोग्राफी केली व बायपास करण्याची सूचना केली. आता मात्र, त्यासाठी आता पैसा हवा होता. हा पैसा येणार कुठूंन या चिंतेने ती माऊली हतबल झाली होती. गावकरीही आपापसात चर्चा करत होती. अशावेळी त्या माऊलीने आपल्या मुलाला फोन करा, तो लगेच पळत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तिने शेजारील काही तरूणांना आपल्या मुलाला संपर्क करण्याचा सांगितले. गावातील लोकांनी या जोडप्याच्या ‘त्यां’ पुण्यातील मुलाला फोन केला. मात्र त्याच्याकडून मिटींग, ऑफीस काम याचे कारण सांगून दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर तर त्याने या गावकर्यांचा अनेकदा फोनसुद्धा घेतला नाही. त्यामुळे सर्वच हवालदिल झाले. अशावेळी सर्व गावकर्यांनी आवाहन करून या वृद्धाच्या मदतीसाठी आर्थिक मदत गोळा केली. त्यातून बायपासची शस्त्रक्रियाही योग्य प्रकारे झाली. आता हे वृद्ध दामप्त्य चांगल्याप्रकारे जीवन जगत आहे. त्यांचा उदरनिर्वाहासाठी मंदीराची साफसफाई हे एकमेव साधन असले ते सुखी आणि समाधानी आहेत. त्यांना गावकर्यांचाही मोठा आधार मिळत आहे. अर्थात त्यांना मुलाच्या अशा स्वार्थी वागणुकीचे मनस्वी दुःख हे होते. अशा या आपल्या वृद्ध मातापित्याला वार्यावर सोडून पुण्यात मौजमजा करणारा हाच मुलगा आता पुण्यात दररोज कोरोनाची रुग्ण आढळू लागल्याने गावाकडे परतला. कंपनीने सुट्ट्या दिल्याच आहेत, त्यामुळे येथे कोरोना होण्यापेक्षा आता गावाकडे जावू, आई, वडीलांनाही खूप दिवस झाले भेटलो नाही, असे पत्नीला सांगून त्याने बॅग भरली होती. वास्तविकतः तो आईवडीलांना भेटण्यासाठी नव्हे किंवा गावाची ओढ म्हणून नाही तर तो जगण्यासाठी धडपडत इकडे गावाकडे आला होता. आजही त्याच्यामधील स्वार्थीपणा कायम होता. अगदी त्यामुळेच त्याला गावकर्यांनी बसस्थानकावरच अडवून तु गावात पाय ठेवू नकोस, आई वडीलांना एकटे सोडून जाणार्याच आमच्या गावात थारा नाही, अशीच भूमिका गावकर्यांनी घेतली होती. यावरही त्यानेही संताप व्यक्त करत थेट पोलिस ठाणे गाठले व याबाबत तक्रार दिली. त्यावर पोलिसांनी गावच्या पंचांना बोलावून घेतले. यावेळी हा तरूणही आपल्या बायकोसोबतच तेथे होताच आणि आपल्या मुलाची चातकाप्रमाणे वाट पाहणारे ते दुर्दैवी आई-वडीलही पोलिस ठाण्यात गावकर्यांसमवेत हजर होते. यावेळी गावकर्यांनी या मुलाचा निर्दयीपणा पोलिसांना सांगितल्यानंतर तेही अवाक झाले. तर तो तरूणही खजिल झाला. माझे खरचं चुकले असे म्हणून तो गहिवरला, रडला. अशावेळी त्या आई-वडीलांचेही डोळे पाणावले आणि त्यांनी गावकर्यांना विनंती करून आपल्या मुलाला गावात प्रवेश करू द्यावा, अशी विनंती केली. मात्र, ही चूक अक्षम्य होती. वडील आजारपणाशी खिळले असताना ती वृद्ध माऊली इतकांकडे मदतीसाठी हात जोडून करणारी याचना अजुनी गावकरी विसरले नव्हते. दवाखान्यात मुलगा आता येईल, मग येईल या आशेने दरवाजापर्यंत जाणारी त्या महिलेची तळमळ आजही कुणी विसरले नव्हते. पतीच्या उपचारासाठी मदतीसाठी पदर पुढे करणात्या त्या माईच्या डोळ्यातील पाणी अजुनही खाली तरळले नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत अशा स्वार्थी मुलाला गावात येवू देणार नाही, बाबा आणि आजी तुम्ही काळजी करू नका, गेल्या 9 वर्षापासून तुमची आम्ही काळजी घेतोय ना ? यापुढेही घेवू असे सांगून त्याला गावातून बाहेरचा रस्ता दाखविला आणि तो तरूणही आपल्या पत्नीला घेवून जड पावलाने डोळे पुसतच पुन्हा मार्गस्थ झाला.
मित्रांनो, ही घटना आपल्या शेजारील एका तालुक्यातील आहे. काल श्रीरामपुरातून राहुरीला येताना एका प्रवाशाने गाडीत ही कहाणी सांगितली. हा घटनाक्रम ऐकून अक्षरश मन हेलावून गेले. एकीकडे निष्पाप प्रेम करणारे आई वडील आणि दुसरीकडे त्यांना वार्यावर सोडणार्या अशा औलादी हे खरोखरच दुर्दैव आहे. कोरोनाच्या या घटनेने तरी त्यांना आई वडीलांची आठवण झाली आणि गावकर्यांनी या तरूणाला गावात प्रवेश न देवून इतर तरूणांना एक धडा दिला. म्हणतात ना एकाला ठेच, दुसरा शहाणा ! अगदी तसेच यातून त्या गावातील तरूणांना याचा बोध झालाच आहे. यातून आपल्याकडेही यातून बोध व्हावा, हिच अपेक्षा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत