कोरोना गो.…...! उंबरेकरांची एकतेची लढाई ; व्यवसाईकांनी पाळला 100 टक्के बंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोना गो.…...! उंबरेकरांची एकतेची लढाई ; व्यवसाईकांनी पाळला 100 टक्के बंद

उंबरे ः प्रतिनिधी    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबत केलेल्या सूचना आणि जिल्हाधिकार्‍यांनी निर्गमित केलेले जमाबबंदीच्या आदे...

उंबरे ः प्रतिनिधी
   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबत केलेल्या सूचना आणि जिल्हाधिकार्‍यांनी निर्गमित केलेले जमाबबंदीच्या आदेशान्वये काल उंबरे गावात तलाठी अंकुश सोनार व ग्रामसेवक शेख यांनी ‘बंद’चे केलेल्या आवाहनाला  पहिल्याच दिवशी 100 टक्के प्रतिसाद मिळाला. कोरोनाबाबत उंबरे गावाने केलेली ही एकजून निश्‍चितच अन्य गावांसाठी दिशादर्शक असणार आहे.
    कोरोनाबाबत प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी गर्दी होते, असे समारंभ, उत्सवही रद्द केले पाहिजेत. याशिवाय दुकाने, आस्थापनाही बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी गावातील सर्वांनी वज्रमूठ आवळली आहे. काल सकाळीच  चहा विक्रेते विजय माळवदे, राजेंद्र  तांबे, शब्बीर पठाण, कमलताई पठाण , अदिनााथ मडके यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करत चहा दुकाने बंद ठेवली. स्टेशनरी व्यवसायिक रवींद्र उंडे, सुदाम देवकर, सुखदेव ढोकणे, योगेश रामभाऊ ढोकणे यांनीही काल आपली दुकाने बंद ठेवली होती. सायकल दुकानदार चांगदेव ढोकणे, बळीराम धोंडे, दीपकराव ढोकणे, राहुल काळे यांनीही या बंदमध्ये आपले योगदान दिले होते. किराणा दुकानदारांनीही योग्य ती खबरदारी घेतली. दुकानदार देवराम गर्जे, आप्पासाहेब ढोकणे, अनिल लक्ष्मण ढोकणे, दत्तात्रय ढोकणे, बाळूकाका भंडारी, बाळासाहेब दुशिंग, आण्णा दुकानदार, जब्बार पठाण, दत्तू भवार, पत्रकार जालिंदर ढोकणे यांनी आपल्या दुकानाबाबत दक्षता घेतल्याचे पहायला मिळाले. सलून व्यवसायिकांमध्ये शेजूळ, गवळी, हुडे, गायकवाड यांनीही आपापली दुकाने बंद ठेवून कोरोनाबाबत गांभीर्य दाखवून दिले. कासार समाजातील व्यवसायिक बाळूकाका उंडे, राजू उंडे यांनीही आपली दुकाने दिवसभर बंद ठेवले होते. गिरणी व्यवसायिक कैलास आडसुरे, रेवन्नाथ ढगे, ज्ञानेश्‍वर भानुदास ढोकणे, दीपक उर्फ पप्पू ढोकणे, निलेश रामभाऊ ढोकणे, राजेंद्र दुशिंग, दुशिंगताई यांनीही कोरोनाच्या या लढ्यात सहभागी होवून एकात्मतेचे दर्शन घडविले. याशिवाय कापड दुकानदार बाळासाहेब ढोकणे, बाळासाहेब हापसे, किशोर तांबे, बिन्हू काळे यांनीही आपली दुकाने बंद ठेवली होती.  याशिवाय बसस्थानक परिसरातील व्यवसायिक नवनाथ काळे, मच्छिंद्र ढोकणे, नारायण काळे, कचरू अडसुरे, चारुदत्त हापसे, गुंजाळ, मोबाईल शॉपी मालक:अक्षय ढोकणे, अनिल दुशिंग, अनिल गायकवाड, ठोंबरे, उद्धव हापसे, नाना बारवेकर, अल्ताब पठाण आदी व्यवसायिकांनी कोरोना विरोधातील या लढ्यात आपापल्या परीने योगदान देवून एक सामाजिक लढ्यास ताकद दिली आहे. दरम्यान, उंबरे गावाने एकत्र येवून 100 टक्के बंद पाळत कोरोनाबाबत घेतलेल्या या दक्षतेचे तलाठी सोनार आणि ग्रामसेवक शेख यांनी कौतूक करत यापुढेही आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे. गरज पडली तरच बाहेर पडायचे आहे, तसेच रविवार दि. 22 रोजी अशाचपध्दतीने आपल्याला बंद पाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला प्रतिसाद द्यायचा असल्याचेही त्यांनी आवाहन केले.
  पै. सुभाष साबळे आणि सामाजिक कार्यकर्ते सोन्याबापू साबळे या दोघा बंधुनीं आपले वडील स्व. गंगाधर साबळे यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्तचे आयोजित केलेले प्रवचन व अन्य धार्मिक कार्यक्रम  स्थगित करून सामाजिक बांधिलकी जपल्याचेही आदर्शवत उदाहरण उंबरे गावात पहायला मिळाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत