उंबरे : प्रतिनिधी। उंबरे आणि परिसरात काल झालेल्या वादळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे तलाठी भाऊसाहेब यांनी तत्का...
उंबरे : प्रतिनिधी।
उंबरे आणि परिसरात काल झालेल्या वादळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे तलाठी भाऊसाहेब यांनी तत्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बबनराव ढोकणे यांनी केली आहे. बबनराव ढोकणे म्हणाले की, सद्या कोरोनाचे आपल्यावर संकट आहे, शासनाच्या आदेशामुळे कुणीही बाहेर पडत नाही, मजूर मिळत नसल्याने गहू, कांदा काढणी रखडलेली आहे, यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यावर काल पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे, काल उंबरे भागात अवकाळी पाऊस झाल्याने त्यात गहू भुईसपाट झाले आहेत, काढणीयोग्य कांदा झोपला आहे, चारपीके हातातून गेली आहेत, याशिवाय छोटी मोठी पडझड देखील झाली आहे, महसूल विभागाने या नुकसानीची दखल घेऊन तलाठी अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून एकरी 50 हजारांची भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे, राज्यात महाआघाडीचे सरकार असून महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचेही याकडे लक्ष वेधनार असल्याचे ढोकणे म्हणाले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत