उंबरे : प्रतिनिधी काही दिवसांपासून कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातला फ. आपल्या जिल्ह्यातही हा आक...
उंबरे : प्रतिनिधी काही दिवसांपासून कोरोना या विषाणूने धुमाकूळ घातला फ. आपल्या जिल्ह्यातही हा आकडा 14 पर्यंत पोहचला आहे, मित्रानो राज्यात आपली अवस्था बिकट आहे, या परिस्थीतीचे भान ठेवून आतातरी कुणी घराबाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन युवानेते अक्षयदादा जरे यांनी केले. अक्षय जरे म्हणाले, आज देश अडचणीत आहे, आणि या देशाचे भविष्य म्हणून ओळखले जाणारे काही तरुण विनाकारण बाहेर फिरत आहेत, वास्तविकता कोरोना हा भयंकर संकट आहे, देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री हे संकट टाळण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, प्रशासनही त्यात डॉक्टर, पोलीस, तहसीलदार जनतेला घरात थांबण्याचे आवाहन करत आहेत, मात्र अजूनही आपले काही मित्र हे ऐकण्यास तयार नाहीत, पोलिसांची आणि घरातील लोकांची नजर चुकवून ते बाहेर फिरत आहे, पण हे योग्य नाही, आपण स्वताची काळजी घेतली पाहिजे व आपल्यापासून इतरांना कोरोना होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, हेच राष्ट्रभक्त या नात्याने आपल्या सर्व तरुणांचे कर्तव्य आहे, त्यामुळे यापुढे तरुणांनी घराबाहेर पडताना आपल्या घरातील लोकांचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणावा, असे आवाहननही जरे यांनी केले
-
x
कोणत्याही टिप्पण्या नाहीत